Vanraj Andekar Gang Killers Govind Komkar saamtv
मुंबई/पुणे

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

Vanraj Andekar Gang Killers Govind Komkar: पुण्यातील नाना पेठेत आंदेकर टोळीने वनराज अंदेकरच्या हत्येचा बदला घेतलाय. गणेशोत्सवाच्या उत्सवादरम्यान वनराजच्या मारेकऱ्याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, ज्यामुळे शहरात भीती पसरली.

Bharat Jadhav

  • पुण्यात नाना पेठ भागात आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा खून केला.

  • हा खून वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला म्हणून करण्यात आला.

  • गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित गँगवॉर घडलं.

पुण्यात गणेशोत्सवामुळे भक्तीमय वातावरण याच वातावरणात गँगवॉरचा भडका उडाला. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर झाल्यानं शहरात दहशतीचं वातावरण पसरलंय. मागील वर्षभरापासून सुडाने पेटलेल्या आंदेकर टोळीने वनराज आंदेकरचा खून करणाऱ्या आरोपी गणेश कोमकरच्या मुलाचा गोळ्या झाडून खून केला. आयुष कोमकर असं मृत मुलाचं नाव आहे. आंदेकर टोळीने प्लॅनिंग करून सप्टेंबर महिन्यातच वनराजच्या हत्येचा बदला घेतला.

गोळ्या झाडून गोविंदची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय. वर्षभरापूर्वी वनराज आंदेकर यांची सप्टेंबर २०२४ मध्ये नाना पेठेत हत्या करण्यात आली होती. वनराज आंदेकर हे २०१७ च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगसेवक म्हणून निवडून आले होते. २०१७ ते २०२२ या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते.

त्याआधी वनराजची आई राजश्री आंदेकर ह्याही नगरसेवक होत्या. २००७ आणि २०१२ अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भुषवलं होतं. तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे सुद्धा नगरसेवक होते. वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या.

आंदेकरचा बदला - तीच जागा तोच महिना

आंदेकर टोळीने नाना पेठ परिसरात फिल्डिंग लावली होती. आरोपी गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणामधील आरोपी होता. त्याला मुलगा गोविंद कोमकर नाना पेठ परिसरात आला होता. त्यानंतर आंदेकर टोळीचे शुटर्स आले आणि त्यांनी गोविंदवर बेछुट गोळीबार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT