IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

IPS Anjana Krishna: अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील वादामुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण झालंय. अंजना कृष्णा कोण आहेत? त्या उपमुख्यमंत्र्यांना का भिडल्या. अमोल मिटकरी यांनी यूपीएससी तक्रार का दाखल केली? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी.
Ajit Pawar vs IPS Anjana Krishna
IPS Anjana Krishnasaam tv
Published On
Summary
  • अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्यात फोनवर वाद झाला.

  • अंजना कृष्णा या महाराष्ट्रातील धडाडीच्या महिला आयपीएस अधिकारी आहेत.

  • अमोल मिटकरी यांनी त्यांच्याविरोधात UPSC कडे तक्रार केली.

  • वादानंतर अजित पवार यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं.

माढ्याच्या डीवायएसपी थेट अजित पवारांना भिडल्या.. मात्र अजित पवारांना भिडणाऱ्या अंजली कृष्णा नेमक्या कोण आहेत? आणि अमोल मिटकरींनी त्यांची युपीएससीकडे तक्रार का केलीय? पाहूयात. हे संभाषण आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूरच्या माढ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यातील. अंजली कृष्णा अवैध मुरुम उपशावरुन थेट अजित पवारांनाच भिडल्यात.तर अजित पवारांनी अंजली कृष्णांवर कारवाईचा इशारा दिलाय.

हा आवाज नीट ऐका. अवैध मुरुम उत्खननाविरोधात कारवाई करणाऱ्या आणि अजित पवारांना थेट भिडणाऱ्या या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णांच्या हिंमतीची जोरदार चर्चा रंगलीय. मात्र अजित पवारांना भिडणाऱ्या अंजली कृष्णा कोण आहेत? पाहूयात. अंजली कृष्णा मूळच्या केरळच्या तिरुअनंतपुरमच्या. वडीलांचं कपड्याचं दुकान तर आई टायपिस्ट म्हणून काम करतात.. त्या 2023 बॅचच्या IPS अधिकारी आहेत.. 2 वर्षापासून त्या राज्यात कार्यरत आहेत.. तर प्रामाणिक आणि दृढनिश्चयी अशी अंजली कृष्णांची ओळख आहे.

Ajit Pawar vs IPS Anjana Krishna
IPS अंजना कृष्णा प्रकरण पंतप्रधान मोदींकडे; कडक कारवाई करा,सुप्रिया सुळेंची मागणी

मात्र माढ्यातील कुर्डू गावच्या रहिवाशांनी मुरुम उपशाची परवानगी होती. त्यानंतरही अंजली कृष्णा कारवाई करत होत्या, असा आरोप केलाय. मात्र अजित पवारांनी ज्या कार्यकर्त्यांसाठी अंजली कृष्णांना फोन केला. त्याच कार्यकर्त्यांवर आता बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अंजली कृष्णांची डेअरिंग काढत त्यांच्या चौकशीची मागणी करत युपीएससीला पत्र लिहिलंय.

Ajit Pawar vs IPS Anjana Krishna
IPS Anjana Krishna: करमाळ्यात IPS अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक, व्हिडिओ व्हायरल

अंजली कृष्णांना दम दिल्याप्रकरणी विरोधकांनी टीकेची झोड उठवली. त्यामुळे अखेर या वादावर पडदा टाकण्यासाठी अजित पवारांनी स्पष्टीकरण जारी केलंय. अजित पवारांनी ट्वीट करुन म्हटलंय की, कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा माझा उद्देश नव्हता.. मात्र त्या ठिकाणची परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याच्या काळजीचा होता... आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे.. मी पारदर्शक कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.

अनेक पोलीस अधिकारी अवैध प्रकारांविरोधात प्रामाणिकपणे सिंघम स्टाईल कारवाई करत असतात. याप्रकरणी अजित पवारांनी आदर व्यक्त करत आपलं स्पष्टीकरण दिलं ..पण त्यांचे आमदार मात्र हुजरेगिरी करण्यात धन्यता मानताना दिसत आह्ेत.. प्रामाणिक अधिकाऱ्याची चौकशी कऱण्याचे मागणी करत आपण प्रामाणिक अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करत आहोत याचं भानही त्यांना अशावेळी रहात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com