IPS Anjana Krishna: करमाळ्यात IPS अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक, व्हिडिओ व्हायरल

IPS Anjana Krishna Photo Milk Abhishek : करमाळ्यातील जनशक्ती शेतकरी संघटनेच्या समर्थकांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या फोटोवर दुग्धभिषेक घातला. जनशक्ती शेतकरी संघटनेने आराध्य दैवत आई कमलाभवानीला प्रार्थना करत दुग्धभिषेक घातला.
IPS Anjana Krishna Photo  Milk Abhishek
Supporters in Karmala perform milk abhishek on IPS Anjana Krishna’s photo to show support after Ajit Pawar row.saamtv
Published On
Summary
  • करमाळ्यात IPS अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धभिषेक.

  • जनशक्ती शेतकरी संघटनेनं गांधीगिरी आंदोलन केलं.

  • अजित पवार यांच्यासोबतच्या वादानंतर IPS अधिकारी चर्चेत.

भारत नागणे, साम प्रतिनिधी

आयपीएस महिला अधिकारी अंजना कृष्णा फोन कॉलमुळे चर्चेत आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फोन संभाषणात वाद घातल्यानंतर डेअरिंगबाज महिला अधिकारी म्हणून त्यांना संबोधलं जातंय. आता या डेअरिंगबाज आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ समर्थनार्थ करमाळ्यात दुग्धभिषेक करण्यात आलायं.

IPS Anjana Krishna Photo  Milk Abhishek
Jalgaon News: बँकेच्या सीसीटीव्हीत दिसले नंतर...; शिवसेनेचा नेता रहस्यमयरित्या बेपत्ता, जळगावात खळबळ

आयपीएस अंजना कृष्णा यांच्या फोटोला जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने दुग्धभिषेक घालण्यात आलाय. आयपीएस अंजना कृष्णा यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने हे गांधीगिरी आंदोलन केलंय. अजित पवार यांनी आयपीएस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना तंबी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्या उपस्थितीत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धभिषेक घातला. आराध्य दैवत आई कमलाभवानीला प्रार्थना करत दुग्धभिषेक केला.

IPS Anjana Krishna Photo  Milk Abhishek
Who Is IPS Anjana Krishna: महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?

यावेळी अजित पवार यांच्या विरोधात बॅनरबाजी देखील करण्यात आली. बॅनरच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यात आलाय. लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे, येथे 'स्त्री' ला इज्जत दिली जाते अशा आशयाचे बॅनर दाखवण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

गावातील मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरिक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली होती. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला. अजित पवार फोनवर असताना त्याने तो फोन अंजली कृष्णा यांच्याकडे दिला. त्यावेळी त्यांनी अजित पवारांचा आवाज ओळखला नाही. अजित पवार यांनी आपली दोनदा ओळख करून दिली.

डीसीएम अजित पवार बोल रहा हूँ. ये कार्यवाही बंद करो, मेरा आदेश हैं, असं दोनदा सांगितलं. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फोन पर कॉल करें.. त्यावर अजित पवार म्हणाले, की तुम पे अॅक्शन लूंगा. इतनी डेरिंग है तुम्हारी. मेरा चेहरा तो पेहचानोगी ना.. असं रागात अजित पवार म्हणाले. दरम्यान हा फोन संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरला झालाय.

सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com