Jalgaon News: बँकेच्या सीसीटीव्हीत दिसले नंतर...; शिवसेनेचा नेता रहस्यमयरित्या बेपत्ता, जळगावात खळबळ

Shiv Sena Leader Missing : जळगाव येथील शिवसेना (शिंदे गट) नेते संजय लोटन पाटील हे गूढपणे बेपत्ता झालेत. बँकेतून पैसे काढताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेवटचे दिसले होते. या घटनेमुळे झाल्याने राजकीय वर्तुळात धक्का बसला आहे.
Shiv Sena Leader Missing
Jalgaon political shock: Shiv Sena leader Sanjay Lotan Patil mysteriously missing after last seen in CCTV footagesaam tv
Published On
Summary
  • जळगावात शिवसेना शिंदे गटाचा नेता संजय लोटन पाटील रहस्यमयरित्या बेपत्ता.

  • शेवटचं सीसीटीव्हीत बँकेत पैसे काढताना आणि कोर्ट चौकात दिसले.

  • गुलाब पाटील यांचे निकटवर्तीय असल्याने राजकारणात खळबळ.

जळगाव: शिवसेना शिंदे गटाचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना घडलीय. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.संजय लोटन पाटील असं शिंदे गटाच्या नेत्याचे नाव असून जळगाव पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याचा तक्रार नोंदवण्यात आलीय. संजय लोटन पाटील हे गुलाब पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय पाटील धरणगाव तालुक्यातील रहिवासी असून ते सध्या धुळे येथे वास्तव्यास होते.

Shiv Sena Leader Missing
Toll Free: केंद्रानंतर राज्य सरकारनं दिली खुशखबर; आता 100 टक्के टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी संजय पाटील गावाकडे जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. त्यादिवसापासून ते बेपत्ता आहेत. बेपत्ता झाल्याच्या दिवशी ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये शहरातील एका बँकेतून पैसे काढताना आणि त्यानंतर कोर्ट चौकाकडे जाताना दिसले होते. पण त्यानंतर ते कुठे गेले याची काही माहिती मिळाली नाहीये. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलंय.

Shiv Sena Leader Missing
'अजित पवार चोरांचे सरदार', ठाकरे गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप, पाहा VIDEO

दरम्यान संजय पाटील हे जळगाव रेल्वे स्थानकावर अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेत बसले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र, यानंतर त्याच्यांशी कोणताही संपर्क झालेला नाहीये. संजय पाटील यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरतंय.

Shiv Sena Leader Missing
Mumbai Protest: मुंबईतील आंदोलनावर बंदी आणा; शिवसेना खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संजय पाटील हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जाते. जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात त्यांचं मोठं नाव होतं. मूळचे धरणगाव तालुक्यातील दोनगावचे ते रहिवासी आहेत. संजय पाटील सध्या धुळ्यात वास्तव्यास होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com