
शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं.
दक्षिण मुंबईतील आंदोलनांवर बंदी घालण्याची मागणी केली.
व्यावसायिक केंद्रे आणि सरकारी कार्यालयांमुळे आंदोलन नको असे मत मांडले.
मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आंदोलन यशस्वी झाले आहे. सरकारनं जीआर काढत मराठा समजाची मागण्या पूर्ण केल्या आहेत. मुंबईतील आंदोलनात झालेल्या काही अपवादात्मक गोष्टींमुळे मराठा आंदोलनाला गालबोट लागलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आंदोनलाबाबत मोठी मागणी केलीय. शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मुंबईतील आंदोलन बंदीची मागणी केलीय.
आगामी काळात दक्षिण मुंबईत अशा आंदोलनांवर बंदी घालावी किंवा त्यांचे स्थान बदलेल,अशी मागणी खासदार मिलिंद देवरा यांनी केलीय. दक्षिण मुंबईमध्ये अनेक वाणिज्य, व्यावसायिक केंद्र आणि सरकारी कार्यालये असल्याने तेथे आंदोलनाच परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आलीय.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं. त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मिलिंद देवरा यांच्या मते, "शांततापूर्ण निदर्शने ही लोकशाहीचा अविभाज्य भाग आहेत, पण ती राज्याच्या राजकीय आणि आर्थिक केंद्राला संकटात टाकू नयेत." आझाद मैदान आणि आसपासच्या ठिकाणी अनेक दिवस सतत आंदोलन झाल्यामुळे नागरिकांचे जीवन आणि व्यवसाय ठप्प पाडण्यात आले होते.
दक्षिण मुंबईत मंत्रालय (मंत्रालय भवन), विधान सभा, Brihanmumbai Municipal Corporation (BMC), मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस मुख्यालये, तसेच पश्चिमी नौदल कमांड आदी अत्यंत महत्वाच्या संस्थांचे केंद्र आहेत. हे सर्व सरकार, प्रशासन आणि वित्तीय क्षेत्राचे मुख्य केंद्रस्थान आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी अस्थिरता येऊ नये, असा हेतू असल्याचा देवरा यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
अशा भविष्यातल्या आंदोलनांना प्रतिबंध घालणे म्हणजेच नागरिकांचे हक्क सुरक्षित करणे, प्रशासनाच्या कामात गती ठेवणे. मुंबईला महाराष्ट्र आणि भारताचे निर्विवाद राजकीय आणि आर्थिक राजधानी म्हणून काम करत राहण्यास परिस्थिती निर्माण करणे होय, असं देवरा म्हणालेत."
मराठा आरक्षण आंदोलनक मनोज जारंगे यांच्या उपोषण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई पाच दिवसासाठी ठप्प झाली होती. त्यात आझाद मैदान, CSMT परिसर आणि BMC कार्यालयाजवळचा परिसर आंदोलकांमुळे गोंगाट आणि तणाव स्थिती या ठिकाणी निर्माण झाली. येथे हजारो लोक जमले होते. रस्त्यावर झोपणे, अंघोळी करणे, स्वयंपाक करणे यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा झालाय.
या काळात BMC ने आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरातून १२५ मेट्रिक टनाहून अधिक कचरा गोळा केला. तर मुंबई पोलिसांनी नऊ गुन्हे नोंदविले आहेत. यात विविध दंडनीय कलमांसह "अनलॉफूल असेंब्ली", "शासनादेशाचा अवज्ञा", आणि "अयोग्य अडथळा" यांचा समावेश होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.