IPS अंजना कृष्णा प्रकरण पंतप्रधान मोदींकडे; कडक कारवाई करा,सुप्रिया सुळेंची मागणी

IPS Anjana Krishna Case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आयपीएस अंजना कृष्णा प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप झाल्यानंतर वाद निर्माण झालाय.
IPS Anjana Krishna Case
Supriya Sule writes to PM Modi, demands action in IPS Anjana Krishna controversy.saam tv
Published On
Summary

IPS अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातील फोन संभाषणामुळे वाद निर्माण झाला.

या प्रकरणात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट हस्तक्षेप केला.

सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करून कारवाईची मागणी केली.

आयपीएस अंजना कृष्णा यांच्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतलीय. सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची थेट पंतप्रधान मोदींनी तक्रार केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकार अंजना कृष्णा यांना फोनवर दम भरल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजुने टीका केली जातेय. कर्त्यव्यावर असलेल्या महिला अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी सुप्रियाताईंनी अजित दादांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट टॅग करत तक्रार केलीय. तसेच कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या पोस्टमधून केलीय.

IPS Anjana Krishna Case
CIDCO Lottery 2025: घराचं स्वप्न होईल पूर्ण; नवी मुंबईत सिडकोकडून २२००० घरांची जम्बो लॉटरी

सत्ताधाऱ्यांकडून आयपीएस अंजना कृष्णा यांच्या पात्रतेवर हल्ले होत होत आहेत. हे हल्ल्यांमुळे टीकांमुळे संविधानावर गंभीर आघात पोहोचत आहे. ज्यावेळी निवडून आलेले प्रतिनिधी व्यक्तिमत्त्व हननाचे कारस्थान करतात. तेव्हा कायद्याच्या अधिनियमावर, तसेच कलम १४ आणि ३११ वर आघात होत असतो. महिला अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने लक्ष्य करणं हे संविधानाने हमी दिलेल्या लिंग समानतेच्या तत्त्वाच्या विरोधी आहे.

IPS Anjana Krishna Case
IPS Anjana Krishna: करमाळ्यात IPS अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक, व्हिडिओ व्हायरल

कार्यकारी विभागातील सर्व सदस्यांना राजकीय दबावापासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे. , तेव्हाच आपल्या संविधानाने जपलेली ‘भारताची संकल्पना’ अबाधित राहील,असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच नागरी सेवांची स्वायत्तता जपण्यासाठी योग्य ती करवाई करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी टॅग करत ट्विट केलंय.

सुप्रिया सुळे आपल्या ट्वीटमध्ये काय म्हणाल्या?

सत्ताधारी गटातील सदस्यांकडून आयपीएस अंजना कृष्णा यांच्या पात्रतेवर होत असलेले हल्ले हा आपल्या संविधानावर गंभीर आघात आहे. निवडून आलेले प्रतिनिधी जेव्हा व्यक्तिमत्त्व हननाचे कारस्थान रचतात, तेव्हा ते कायद्याच्या अधिनियमावर, तसेच कलम १४ आणि ३११ वर आघात करतात.

IPS Anjana Krishna Case
Who Is IPS Anjana Krishna: महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?

महिला अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने लक्ष्य करणे हे संविधानाने हमी दिलेल्या लिंग समानतेच्या तत्त्वालाही विरोधी आहे. कार्यकारी विभागातील सर्व सदस्यांना राजकीय दबावापासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे, तेव्हाच आपल्या संविधानाने जपलेली ‘भारताची संकल्पना’ अबाधित राहील. सार्वजनिक पदाचे गांभीर्य आणि नागरी सेवांची स्वायत्तता जपण्यासाठी योग्य ती कारवाई होईल, अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.

सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांचे फोनवरील संभाषण व्हायरल झाले आहे. यात अजित पवार आणि आयपीएस अधिकारी यांच्यात खडाजंगी झाली. यात अजित पवार महिला अधिकाऱ्याला दम देताना दिसत आहेत. अजित पवार फोनवर म्हणाले की, "मी उपमुख्यमंत्री आहे आणि मी तुमच्याशी बोलत आहे. मी तुम्हाला कारवाई थांबवण्याचा आदेश देतो... जा आणि तुमच्या डॉक्टर श्रीधर (वरिष्ठ अधिकारी) यांना सांगा की उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई थांबवण्याचा आदेश दिलाय."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com