Mumbai - Bengaluru Vande Bharat Sleeper Trai Saam Tv
मुंबई/पुणे

Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

Mumbai - Bengaluru Vande Bharat Sleeper Train: मुंबईतून लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. या ट्रेनमुळे बंगळुरूला फक्त १६ तासांत पोहचणं सोपं होणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक आणि थांबे याची माहिती समोर आली आहे.

Priya More
  • मुंबई ते बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार

  • मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनचे संभाव्य वेळापत्रक समोर

  • मुंबई- बंगळुरू प्रवास १६ तासांत होणार पूर्ण

  • वंदे भारत स्लीपर ट्रेनला सोलापूर, पुणे, कल्याण येथे थांबे

मुंबई आणि बंगळुरू ही दोन प्रमुख शहरं लवकरच आणखी जवळ येणार आहेत. या दोन्ही शहरातील प्रवास लवकरच सुसाट आणि आरामदायी होणार आहे. या दोन शहरांमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. या प्रवासासाठी सध्या २२ ते २४ तासांचा कालावधी लागतो. पण वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास फक्त १६ तासांचा होणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा प्रवासाचा कालावधी ६ ते ८ तासांची कमी होणार आहे. मुंबई ते बंगळुरू दरम्यान धावणारी ही दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन असणार आहे. या आधी गुवाहाटी ते हावडादरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावली.

दोन शहरं जवळ येणार -

मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाण्याची शक्यता आहे. रेल्वे बोर्ड लवकरच केएसआर बंगळुरू- मुंबई सीएसएमटी वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे. देशातील दुसऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे देशातील टेक्निकलचे केंद्र असलेल्या बंगळुरू आणि आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई यांच्यातील प्रवासाचे अंतर आणि वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे.

ट्रेनचे वेळापत्रक -

वेळापत्रकानुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही स्थानकावरून आठवड्यातील सहा दिवस धावतील. बंगळुरू येथून सोमवार सोडून इतर दिवशी ही ट्रेन धावणार आहे. तर मुंबईत मंगळवार सोडून इतर दिवशी ही ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन अवघ्या १६ तासांपेक्षा कमी वेळात मुंबईवरून बंगळुरू आणि बंगळुरूवरून मुंबईत पोहचेल. सध्या या दोन्ही शहरांदरम्यान धावणारी एकमेव उद्यान एक्स्प्रेस आहे. या ट्रेनच्या प्रवासासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. वंदे भारत स्लीपर ट्रेन बंगळुरू येथून रात्री १० वाजता सुटेल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहचेल. परतीच्या प्रवासात, ही ट्रेन मुंबईवरून रात्री १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दिवशी दुपारी १.५० वाजता बंगळुरू येते पोहचे

ट्रेनला थांबा कुठे?

वंदे भारत स्लीपर ट्रेन अनंतपूर, गुंटकल, रायचूर, कलबुर्गी, सोलापूर आणि कल्याण या स्थानकांवर थांबेल. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये १६ प्रवासी डबे आहेत. या ट्रेनमध्ये ११ एसी ३-टियर डबे, चार एसी २-टियर डबे आणि एक एसी फर्स्ट क्लास डब्याचा समावेश आहे. ही ट्रेन ताशी १६० किमी वेगापर्यंत धावेल. तर तिचा चाचणी वेग ताशी १८० किमी आहे. ज्यामुळे ती सेमी-हाय-स्पीड श्रेणीत येते. या ट्रेनला स्वयंचलित दरवाजे असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीत सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली

बायकोला टीबी, मुलीची फी भरायला पैसे नाही; शिवार हेल्पलाईनवर शेतकऱ्यांचा टाहो, 'या' 5 जिल्ह्यांतून सर्वाधिक कॉल

Rajyasbha Election: भाजपमध्ये मोठा फेरबदल होणार; मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री देणार राजीमाना?

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

SCROLL FOR NEXT