महाराष्ट्रातील स्लीपर वंदे भारत 'या' मार्गाने धावणार; तुमच्या शहरात थांबणार का? वाचा गाड्यांचे वेळापत्रक अन् थांबे

Vande Bharat Sleeper update : मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रस्तावित मार्ग, वेळापत्रक आणि थांबे समोर आले आहेत. ही ट्रेन पुणे आणि सोलापूर मार्गे धावणार असून कल्याण, पुणे, सोलापूरसह ११ स्थानकांवर थांबण्याची शक्यता आहे.
Vande Bharat Sleeper train update
Vande Bharat Sleeper train updateSaam TV
Published On: 

Mumbai Bengaluru Sleeper Vande Bharat : मुंबई आणि बंगळुरू या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित 'स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस'चा प्रस्तावित मार्ग आणि वेळापत्रक रेल्वे बोर्डाकडून समोर आले आहे. ही नवी स्लीपर ट्रेन सोलापूर मार्गे चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एका बाजूला सोलापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव परिसरातील प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचा पत्ता कट

रेल्वेने तयार केलेल्या नवीन आराखड्यानुसार ही गाडी मुंबई सोलापूर-पुणे मार्गे धावणार आहे. यामुळे मिरज, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगावी, हुबळी, धारवाड, दावणगेरे या महत्त्वाच्या शहरांना या वेगवान ट्रेनची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार नाही. या भागातील लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांनी ही ट्रेन मिरज-बेळगावी मार्गे नेण्याची मागणी केली होती. मात्र, सोलापूर मार्गाला प्राधान्य दिल्याने पश्चिम महाराष्ट्राच्या हातातून ही मोठी संधी निसटल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोणत्या मार्गाने धावणार, थांबे कोणते असणार?

मुंबई-बंगळुरू ही स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस १,१३७ किलोमीटरचे अंतर कापणार आहे. या प्रवासाचा वेळ अंदाजे १५ ते १६ तासांवर येणार आहे. सीएसएमटी मुंबई, कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, रायचूर, गुंतकल, अनंतपूर, धर्मावरम आणि केएसआर बंगळुरू या स्थानकावर एक्सप्रेस थांबणार आहे.

Vande Bharat Sleeper train update
मोठी बातमी: भाजपकडून शिक्षक-पदवीधरसाठी उमेदवारांची यादी जाहीर! नागपूर, पुण्यातून 'हे' चेहरे मैदानात

वेळापत्रक आणि आठवड्यातून किती दिवस?

रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावानुसार ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. बंगळुरू ते मुंबई (ट्रेन क्र. २७६५२): ही वंदे भारत एक्सप्रेस बंगळुरूहून रात्री १०:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:५० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल. (सोमवार वगळता)

मुंबई ते बंगळुरू (ट्रेन क्र. २७६५१): ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबईवरून दुपारी २:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता बंगळुरू येथे पोहोचेल. (मंगळवार वगळता)

ही पूर्णपणे वातानुकूलित (AC) स्लीपर ट्रेन असणार असून यात ३-टियर एसी, २-टियर एसी आणि १-टियर एसी (फर्स्ट क्लास) असे तीन वर्ग असतील.

Vande Bharat Sleeper train update
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! मुंबई ते ठाणे प्रवास अवघ्या २५ मिनिटांत; MMRDA चा मोठा निर्णय

अंदाजित तिकीट दर:

नवीन स्लीपर वंदे भारतमुळे मुंबई-पुणे-सोलापूर ते बंगळुरूदरम्यानचा प्रवास अत्यंत वेगवान आणि आरामदायी होणार आहे. ३-टियर एसीचे तिकिट अंदाजे ₹२,२०० ते ₹२,५००, २-टियर एसीचे तिकिट ₹३,२०० ते ₹३,६०० तर फर्स्ट एसीचे भाडे ₹४,००० ते ₹४,५०० च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. (अधिकृत भाडेपत्रक रेल्वेकडून लवकरच जाहीर केले जाईल.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com