मोठी बातमी: भाजपकडून शिक्षक-पदवीधरसाठी उमेदवारांची यादी जाहीर! नागपूर, पुण्यातून 'हे' चेहरे मैदानात

BJP MLC Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारीवर चर्चा सुरू आहे. पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर मतदारसंघातील उमेदवारांबाबत मोठी अपडेट जाणून घ्या.
Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?
Bihar UP MLC PollsSaam Tv
Published On: 

BJP MLC candidate list : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने (BJP) आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले, राष्ट्रीय मुख्यालय प्रभारी आणि राज्यसभा खासदार तरुण चुघ यांच्या स्वाक्षरीने ही अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या यादीनुसार, भाजप विधानपरिषदेच्या रिंगणात जुन्या आणि अभ्यासू चेहऱ्यांसोबत नव्या कार्यकर्त्यांना संधी देऊन मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे अधिकृत उमेदवार खालीलप्रमाणे:

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ :

उमेदवार: सुधाकर विठ्ठलराव कोहळे

नागपूर पदवीधर मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. भाजपचे माजी आमदार आणि अनुभवी नेते सुधाकर कोहळे यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ

उमेदवार: डॉ. स्मिता योगेश जाधव

पुणे पदवीधर मतदारसंघातून पक्षाने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना संधी दिली आहे. पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि उच्चशिक्षित मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा महिला चेहरा मैदानात उतरवण्यात आला आहे.

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?
मोठी राजकीय घडामोड! राहुल गांधींची ताकद वाढली, भाजपविरोधातील लढ्यात आणखी एका पक्षाची साथ, नेमकं झालं काय?
BJP MLC Election 2026
BJP MLC Election 2026

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ

उमेदवार: कौस्तुभ मुरलीधर गावडे

पुणे शिक्षक मतदारसंघातून पक्षाने कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना रिंगणात उतरवले आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांवर मात करण्यासाठी गावडे यांच्या उमेदवारीचा भाजपला मोठा फायदा होईल असा दावा केला जात आहे.

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?
Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, जवानाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चक्काचूर; ४ जणांचा दुर्दैवी अंत

महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ संपत आल्याने या द्विवार्षिक निवडणुका पार पडत आहेत. या मतदारसंघांमध्ये पदवीधर मतदार आणि शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक असते. भाजपने सर्वात आधी आपली उमेदवारी यादी प्रसिद्ध करून प्रचारात आघाडी घेतली आहे. या घोषणेनंतर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल पाहायला मिळत असून आता महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्ष कोणाला मैदानात उतरवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर पदवीधर: सुधाकर कोहळे यांच्या रूपाने भाजपचा तगडा चेहरा मैदानात

नागपूर पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माजी आमदार सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसने याआधीच अभिजित वंजारी यांना दुसऱ्यांदा या मतदारसंघातून उमेदवारी देऊन मैदानात उतरवले आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात आता काँग्रेस विरुद्ध भाजप असा अटीतटीचा आणि रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर असताना सुधाकर कोहळे हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी गेले होते. ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित असतानाच दिल्लीतून भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची अधिकृत यादी प्रसिद्ध झाली आणि त्यात कोहळे यांची उमेदवारी जाहीर झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुधाकर कोहळे यांच्यावर आधीच निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. आता थेट उमेदवारी दिल्याने नागपूरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पुणे पदवीधर: डॉ. स्मिता योगेश जाधव - अष्टपैलू अन् उच्चशिक्षित नेतृत्व

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. (श्रीमती) स्मिता योगेश जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. शिक्षण, माध्यम आणि उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डॉ. स्मिता जाधव यांच्या रूपाने उच्चशिक्षित आणि प्रभावी महिला नेतृत्व पदवीधरांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com