Vande Bharat Express Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईहून निघणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट! वेळापत्रकात मोठा बदल; ८ स्थानकांवर थांबणार

Vande Bharat Express: मुंबई–गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. गाडीला आता नवीन थांबा आनंद जंक्शन येथे मिळाला आहे. या बदलामुळे गाडीचे एकूण थांबे ८ झाले आहेत.

Bhagyashree Kamble

  • मुंबई–गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

  • गाडीला आता नवीन थांबा आनंद जंक्शन येथे मिळाला आहे.

  • या बदलामुळे गाडीचे एकूण थांबे ८ झाले आहेत.

  • ट्रेन क्रमांक 20901 सकाळी ६ वाजता मुंबई सेंट्रलहून सुटते तर 20902 दुपारी २:०५ वाजता गांधीनगरहून सुटते.

भारतीय रेल्वेची सर्वात प्रीमियम गाडी म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांची आवडीची बनली आहे. वंदे भारत कमी वेळात जास्त अंतर कापते. तसेच आधुनिक सुविधा उपलब्ध असल्यामुळे या एक्स्प्रेसला मोठी पसंती मिळते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी हिरवा झेंडा दाखवलेल्या देशातील तिसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला आहे.

मुंबई - गांधीनगर ही वंदे भारत ट्रेन मुंबई सेंट्रल आणि गांधीनगर राजधानी दरम्यान धावते. ही सेमी हाय स्पीड ट्रेन पश्चिम रेल्वे झोनद्वारे देखभाल आणि चालवली जाते.

ट्रेन क्रमांक २०९०१/२०९०२ आठवड्यातून एक दिवस (बुधवार) वगळता रोज धावणार. पूर्वी सात स्थानकांवर थांबणारी ही गाडी आता आठ स्थानकांवर थांबेल. नवीन थांबा आनंद जंक्शन येथे देण्यात आला आहे. अशा प्रकारे ही वंदे भारत एक्स्प्रेस बोरिवली, वापी, वलसाड, नवसारी, सुरत, वडोदरा जंक्शन, आनंद जंक्शन आणि अहमदाबाद जंक्शनवर थांबेल.

वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक २०९०१) मुंबई सेंट्रलहून सकाळी ६ वाजता निघते. दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी गांधीनगर राजधानीला पोहोचते. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक २०९०२ गांधीनगरहून दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी निघते. तसेच रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचते. आता या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आणखी एक थांब्याचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

Pigeon Shelters: हायकोर्टाचा आदेश धुडकावून मुंबईत टेरेसवर कबुतरखाने

SCROLL FOR NEXT