Vasant More Saam Tv
मुंबई/पुणे

Vasant More On MNS Melava: काही आठवणी कधीच बुडत नाहीत, वसंत मोरेंना येतेय मनसेच्या मेळाव्याची आठवण

Vasant More On MNS: मनसेची साथ सोडत वंचित बहुजन आघाडीशी (Vanchit Bahujan Aghadi Party) हात मिळवणी करणाऱ्या वसंत मोरे यांनी मनसेच्या गुडीपाडवा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे (Vasant More) यांना मनसेच्या गुडीपाडवा मेळाव्याची आठवण येत आहे.

Priya More

Vasant More On MNS Gudi Padwa Melava:

आज मनसेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा (Gudipadwa Melava) होणार आहे. मनसेच्या या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यामागचे कारण म्हणजे मनसेचा गुढीपाडवा मेळवा आणि लोकसभा निवडणूक हे समीकरण जळून आले आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात नेमकं काय बोलणार याकडे सर्व राजकीय पक्षांसोबत राज्याचे लक्ष लागले आहे. मनसेची साथ सोडत वंचित बहुजन आघाडीशी (Vanchit Bahujan Aghadi Party) हात मिळवणी करणाऱ्या वसंत मोरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे (Vasant More) यांना मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची आठवण येत आहे.

बहुजन वंचित आघाडीचे पुण्याचे उमेदवार वसंत मोरे यांनी नुकताच मनसेच्या आजच्या होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, '१०० टक्के मनसे मेळाव्याची आठवण येते. जितके पाडवे आले तेव्हा प्रत्येक वेळी गुढी उतरताना मी शिवतीर्थावर होतो. काही आठवणी आहेत त्या कधीच बुजत नाहीत.', असे म्हणत वसंत मोरे यांनी खंत व्यक्त केली.

वसंत मोरे काही दिवसांपूर्वी नाराज होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरू होती. वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने त्यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशामध्ये वंचित बहुजन आघाडीने त्यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्याविरोधात वसंत मोरे निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी पुणे, नाशिक आणि रायगडमधील मनसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुण्यातून शक्ती प्रदर्शन करत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. रायगड येथील मनसेचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर नाशिक येथून शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मनसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT