nilesh chavan  Saam tv
मुंबई/पुणे

Nilesh Chavan Arrest : पुण्यातून निसटला, नेपाळ बॉर्डरला पोहोचला; वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला कसं पकडलं? वाचा अटकेचा थरार

Nilesh Chavan Arrested : पुण्यातून निसटल्यानंतर नेपाळला पोहोचलेल्या निलेश चव्हाणच्या पोलिसांंनी मुसक्या आवळल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेशला अटक केली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभरात गाजत आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत तिच्या सासरच्या हगवणे कुटुंबातील काही सदस्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी त्याला नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. बंदुकीच्या धाकावर वैष्णवीच्या अवघ्या १० महिन्यांच्या बाळाला स्वतःकडे ठेवणाऱ्या निलेश चव्हाणच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे.

निलेश चव्हाण गेल्या दहा-बारा दिवसांपासून फरार होता. निलेश ताब्यात घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी बावधन पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांची एकूण पाच पथके त्याच्या मागावर होती.

पोलिसांना निलेश चव्हाण परराज्यात निघेून गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलं. पिंपरी-चिंचवड पोलीस निलेश चव्हाणला कोर्टासमोर सादर करण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक ४ पथक, गुंडा विरोधी पथक आणि सायबर क्राईम ब्रांचने मिळून संयुक्तपणे निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डर करून ताब्यात घेतलं. आरोपी निलेश चव्हाणला आज मध्यरात्री दोन वाजता पुणे विमानतळावर घेऊन येणार आहेत. निलेश चव्हाणला विमानाने पुण्यात आणणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये बँक घोटाळ्याविरोधात मेथे दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT