Vaishnavi Hagawane Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: मोठ्या सूनेचाही असाच छळ केला अन्..., वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं हगवणे कुटुंबाचं हैवानी कृत्य

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या वडिलांनी हगवणेंच्या मोठ्या सूनेबद्दल धक्कादायक माहिती सांगितली. हगवणेंनी मोठ्या सूनेचाही असाच छळ केल्याचे ते म्हणाले.

Priya More

वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. वैष्णवीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे. तर तिचा सासरा आणि दीर अद्याप फरार आहे. वैष्णवीने आत्महत्या करून ६ दिवस झाले तरी देखील फरार आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. हगवणे कुटुंबीयांनी फक्त वैष्णवीचाच छळ केला नाही तर मोठ्या सूनेचाही तसाच छळ केल्याची धक्कादायक माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दिली.

वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणे कुटुंबाचे हैवानी कृत्य माध्यमांसमोर सांगितले. ते म्हणाले की, 'मोठ्या सूनेचं प्रकरण असेच दाबलं गेलं. त्या मुलीला वडील नाहीत. माझ्या मुलीच्या अंत्यसंस्कारावेळी ती आली होती. तिने इथे आम्हाला सांगितलं तिचाही असाच छळ सुरू होता. ती त्यांची मोठी सून होती. तिला हाणून मारून हाकलवून दिलं. तिची केस देखील अशीच दाबली जात आहे. ती केस आजही चालू आहे पण ती केस दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'

वैष्णवीच्या वडिलांनी लग्नातला एक किस्सा सांगितला ते म्हणाले की, 'अजित पवार लग्नाला आले होते. ते अर्धा -पाऊण तास लग्नात होते. आशीर्वाद देण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी कारकडे पाहून ही विचारणा केली होती. ही कार यांनी मागितली की तुम्ही दिली अशा खोचक शब्दात अजित पवारांनी प्रश्न विचारला होता. तेव्हा उपस्थितांमध्ये हश्या झाला होता.'

राजेंद्र हगवणेला राजकीय पाठबळ आहे. अजित पवार आणि राजेंद्र हगवणे यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्याकडून त्यांना पाठिंबा मिळत असल्याचा दावा कस्पटे कुटुंबीयांना केला आहे. अजितदादांना एकच विनंती आहे की माझ्या लेकीला आणि तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्यावा, अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सूर्यकुमार-शिवमची बॅट तळपली; भारताचा न्यूझीलंडवर दमदार विजय

अकोल्यात भाजपने डाव टाकला; शरद पवारांचा पक्ष फोडला, सत्ता समीकरणासाठी बहुमताचा आकडा गाठला

गोगावलेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांना आत्मसमर्पण, तुरुंगात जावं लागणार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Tourism: मुंबईपासून १४० किमी अंतरावर आहे,सुंदर हिल स्टेशन; लोणावळाही विसराल

Fack Check : सलमान खानचा MIM मध्ये प्रवेश? व्हायरल व्हिडिओने बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT