Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीने आयुष्य संपवले नाही, तर...; भाजपच्या महिला नेत्याचा गंभीर आरोप

Chitra wagh on Vaishnavi Hagawane Case : भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावर गंभीर प्रतिक्रिया दिली. यावेळी कोणालाही सोडलं जाणार नसल्याचं म्हटलं.
Vaishnavi Hagawane Death Case
Vaishnavi Hagawane Death CaseSaam Tv News
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात भाजपच्या महिला नेत्या, आमदार चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला आहे. वैष्णवीची बातमी वाचल्यानंतर मला खूप वेदना झाल्या. वैष्णवीची आत्महत्या नाही तर ती हत्याच आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ या नांदेड दौऱ्यावर आहेत. चित्रा वाघ यांनी नांदेड दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चित्रा वाघ यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावर मोठं भाष्य केलं. चित्रा वाघ म्हणाल्या, 'मी पुण्याच्या पोलिसांशी देखील बोलले. ही आत्महत्या नाही तर तिला आत्महत्येला प्रवृत्त केले. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या'.

Vaishnavi Hagawane Death Case
Naval Kishore Ram : पुण्याला मिळाले नवीन आयुक्त; कोण आहेत नवल किशोर राम? वाचा एका क्लिकवर

'एका मुलीला तळ हाताच्या फोडासारखं वाढवतात आणि लग्न करून दिल्यानंतर तिच्यावर थूंकतात. तिला मारहाण करतात. तिचे केस उपटतात. हे हैवानासारखं काम आहे. हगवणे तो कोण पण असू दे, तो कुठल्याही पार्टीचा असू दे, कोणाच्या किती पण जवळ असू दे, मांडीला मांडी लावून बसणारा असू दे, वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा फॉलो करू, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Vaishnavi Hagawane Death Case
Vaishnavi Hagawane Case : हगवणेला धाब्यातून जेवण; वैष्णवीच्या वडिलांनी सुप्रिया सुळेंना नेमकं काय सांगितलं?

'वैष्णवी तिच्या आई-वडिलांची मुलगी नाही तर ती या महाराष्ट्राची मुलगी आहे.असे चित्रा वाघ म्हणाल्या.आज 21 व्या शतकामध्ये देखील हुंड्यासाठी ज्या पद्धतीने मुलीला मारलं जातं. त्यांना मरण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या लेकराचा देखील विचार केला गेला नाही. वैष्णवीला ज्या पद्धतीने टॉर्चर केलं गेलं, ते अमानवी आहे, असे वाघ पुढे म्हणाल्या.

Vaishnavi Hagawane Death Case
Crime News : खळबळजनक! आधी तरुणीची हत्या केली, नंतर सुटकेसमध्ये मृतदेह भरून धावत्या ट्रेनमधून फेकलं

'पुणे पोलिसांनी वैष्णवीचा नवरा आणि तिच्या कुटुंबीयांना अटक करण्यात केली आहे. सासरा आणि एक मुलगा फरार आहे. ते देखील पकडले जातील. कोणालाही सोडलं जाणार नसून हे देवेंद्र फडणवीस राज्य आहे. राज्यात महायुतीचं राज्य आहे. कोणी कितीही जवळचा असला तरी देवा भाऊ कोणालाही सोडणार नाहीत. आम्ही वैष्णवीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सोने, चांदी, गाडी, मागण्यात आलं. वैष्णवीच्या आईने सांगितल्याप्रमाणे पोरीला त्रास होत असेल तात्काळ ॲक्शन घेतली पाहिजे. या हैवान, राक्षसांना शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही, चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत ही प्रतिक्रिया दिली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com