Vaishnavi Hagawane Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: हुंडाबळी घेणाऱ्या राजेंद्र हगवणेला बेड्या, वैष्णवीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले ?

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात फरार असलेल्या तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दिराला पोलिसांनी आज पहाटे अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली आहे.

Priya More

हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पुण्यात वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली. या प्रकरणी फरार असलेले तिचे सासरे आणि दिराला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणात वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद यांना आधीच अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींनी वैष्णवीला हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला होता. त्यामुळेच वैष्णवीने १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या फरार सासरा आणि दिराला अटक केल्यानंतर तिच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. आरोपींना सोडू नका, त्यांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचसोबत, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

वैष्णवीचे वडील अनिल कस्पटेंनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की, 'पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात विलंब केला. काल पोलिस प्रशासनाने अजितदादांच्या आदेशानुसार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आणि मीडियाच्या माध्यमातून प्रकरण उचलून दिले. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी आदेश दिले होते की, १२ तासांच्या आत आरोपींना अटक करा. आरोपींना मागच्यावेळी जशी व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाली तशी यावेळी मिळू नये अशी माझी विनंती आहे.'

आनंद कस्पटेंनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की,'आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यांना मोका कायद्यांतर्गत शिक्षा द्यावी कारण यापुढे अशा काही घटना कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाहीत. सध्या मी माझ्या लेकीच्या दुखात आहे त्यामुळे वैष्णवीची जाऊबाई मयुरी जगतापने काय स्टेटमेंट दिले हे मी पाहिले नाही. पण वैष्णवीचे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि लवकरात लवकर माझ्या मुलीला न्याय मिळावी ही विनंती आहे.'

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना आज यश आले आहे. या दोन्ही आरोपींना या घटनेच्या ७ व्या दिवशी अटक करण्यात आली. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज पहाटे पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली. गेल्या सात दिवसांपासून हे आरोपी फरार झाले होते. फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आज अखेर या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT