Hagawane Family x
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : हगवणे कुटुंबाच्या अडचणी वाढल्या, पुणे पोलिसांकडून नोटीस

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणी न्यायालयाने शशांक, लता आणि करिष्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर राजेंद्र, सुशील ३१ मे पर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. याचदरम्यान पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबाला नोटीस पाठवण्यात आली आहे.

Yash Shirke

Vaishnavi Hagawane News : पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना नोटीस पाठवण्यात आली आङे. शस्त्र परवाना रद्द का करु नये असे या नोटीसमधून विचारण्यात आले आहे. हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करावा अशी सूचना पिंपरी चिंचवड पोलिसांनी पत्रातून केली आहे. हगवणेंच्या शस्त्र परवान्याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे पोलिसांना अहवाल दिला आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात न्यायालयाने वैष्णवीचे सासरे आणि दीर यांना ३१ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. तर वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली होती. आज कोठडीची कालावधी संपल्यानंतर पुन्हा तिघांना न्यायालयासमोर सादर करण्यात आले.

शशांक हगवणे, लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर लगेचच लता आणि करिष्मा हगवणे यांनी जामिनासाठी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला. त्यांच्या अर्जाच्या निवंतीवर उद्या न्यायालयात सुनावणी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबाला नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली.

हगवणे कुटुंबाला त्यांच्याकडे असणाऱ्या शस्त्र परवाना बाबत पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सूचना करण्यात आली आहे. तुमचा परवाना रद्द का करु नये असा सवाल नोटीसमधून विचारण्यात आला आहे. जर या नोटीसवर हगवणे कुटुंबियांनी उत्तर दिले नाही, तर त्यांचा शस्त्र परवाना रद्द केला जाईल. पुढील आठवड्यात पुणे पोलीस शस्त्र परवाना रद्द करु शकतील असे म्हटले जात आहे. हगवणे कुटुंबियांकडे ३ शस्त्र परवाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

SCROLL FOR NEXT