पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने स्वत:ला संपवल्याचे म्हटले जात आहे. ही आत्महत्या नसून हत्याच आहे असा आरोप वैष्णवीच्या आईवडिलांनी केला आहे. या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. वैष्णवीची जाऊबाई मयुरीने या प्रकरणावर भाष्य केले आहे.
'माझा पती (सुशील) घरी नसताना दीर, सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून मारहाण केली जात असे. माझ्या पतीमुळे मी जिवंत आहे. त्यांनी माहेरी आणून सोडल्यामुळे मी जिवंत आहे. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव त्यांना (सुशील - मयुरीचे पती) होती. सासरे, सासू, नणंद आणि दीर (शशांकचे पती) माझ्यासह वैष्णवीला सुद्धा त्रास देत होते', असे मयुरीने म्हटले आहे.
मारहाण, छळ, त्रासामागे नणंद करिष्मा असल्याचे मयुरीने प्रसारमाध्यमांना सांगितले. 'वैष्णवीला मारहाण होत असल्याचे मला घरातील कर्मचाऱ्यांकडून समजले. मारहाणीचा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. तो मोबाईल काढून घेण्यासाठी शशांकने उचलून आपटल्याचे मयुरीने सांगितले. वैष्णवी सासरकडच्यांना घाबरत होती. हगवणे कुटुंबियांकडून माझ्या नवऱ्यालाही त्रास दिला जात होता', असेही मयुरीने म्हटले.
'घरामध्ये नेहमीच सासू-नणंदेकडून टॉर्चर केले जात असे. त्या छोट्या-छोट्या गोष्टींवर आमच्याशी वाद घालायच्या. चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला होता. सासऱ्यांकडे बघते असं म्हणत त्रास दिला गेला. ते (हगवणे कुटुंब) जिवंत सोडणार नाहीत हे माहित असल्यामुळे त्यांच्यापासून आम्ही वेगळे होतो', अशी माहिती वैष्णवीची जाऊबाई मयुरी हगवणेने म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.