Vaishnavi Hagawane Case X
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : आधीही विष घेऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न अन्...; वैष्णवी हगवणे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सासरकडच्या लोकांच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आधाही विषारी औषध जेवणातून घेतल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Yash Shirke

अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात होते. पण वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे असा दावा तिच्या आईवडिलांनी केला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. याआधीही वैष्णवीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

'ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गरोदर होती. तिने ही आनंदाची बातमी शशांक, तिच्या पतीला सांगितले. पण शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला, हे मूल माझं नसल्याचे शशांकने म्हटले. सासरकडच्या लोकांनी वैष्णवीचा छळ केला. तिला मारहाण केली, घरातून हाकलून दिले. वैष्णवीने माहेरी आल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला', असे वैष्णवीच्या वडिलांनी, अनिल साहेबराव कस्पटे यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.

'सासरी होणारा छळ सहन न झाल्याने वैष्णवीने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी विषारी औषध जेवणात घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वैष्णवीची तब्येत बिघडल्यानंतर आम्ही तिला एम्स रुग्णालयात दाखल केले. चार दिवस तिच्यावर उपचार सुरु होते. तेव्हा सासरकडच्यांनी तिची विचारपूस केली नाही. रुग्णालयातून तिला माहेरी आणले. काही दिवसांनी वैष्णवी सासरी गेली. पण तिचा छळ सुरुच होता. त्यानंतर १५-१६ दिवसांनी जवाई शशांक आमच्या घरी आले आणि त्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी माझ्याकडे २ कोटी रुपयांची मागणी केली होती', असे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

२०२३ मध्ये वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या लग्नात वैष्णवीच्या वडिलांनी ५१ तोळे सोनं, महागडी फॉर्च्युनर कार यांच्यासह अनेक गोष्टी हुंड्यात दिल्या होत्या. लग्नाच्या काही महिन्यांनंतर वैष्णवीला तिच्या सासरकडच्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण ही आत्महत्या नाही, हत्या आहे असा दावा वैष्णवीचे कुटुंबीय करत आहेत. सध्या वैष्णवीचा नवरा, सासू, नणंद अटकेत आहे. तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT