Vadgaon citizens rasta roko andolan at old pune Mumbai highway Saam Digital
मुंबई/पुणे

Old Pune Mumbai Highway Traffic: वडगावमधील मातोश्री चौकात ग्रामस्थांचा रास्ता राेकाे, जाणून घ्या जुना मुंबई- पुणे महामार्गावरील वाहतुकीची स्थिती

Vadgaon Citizens Held a Rasta Roko Andolan at Old Pune Mumbai Highway: आंदोलकांनी माताेश्री चाैकात हाेणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने ठाेस उपाययाेजना करावी अशी मागणी केली.

दिलीप कांबळे

वडगाव मधील मातोश्री चौकात वारंवार घडणारे अपघात राेखण्यासाठी उपाययाेजना कराव्यात या मागणीसाठी आज जुना मुंबई पुणे महामार्गावरील वडगाव येथील मातोश्री चौकात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी आज (गुरुवार) रास्ता रोको आंदोलन छेडले. यामुळे जुना मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुक एक तास खाेळंबली हाेती.

जुना मुंबई पुणे महामार्गावर बुधवारी वडगांव चौकात मालवाहू कंटेनरच्या विचित्र अपघातात एक महिला ठार झाली हाेती. या घटनेत कंटेनर चालकही गंभीर जखमी झाला हाेता. आज या घटनेच्या निषेधार्थ आणि रस्ता दुरुस्ती ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनामुळे जुना मुंबई पुणे हायवेवरील वाहतुक एक तास ठप्प झाली. यावेळी आंदोलकांनी माताेश्री चाैकात अनेक वेळा छाेटे माेठ अपघात झाले आणि हाेताहेत मात्र आरआयबी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप केला.

दरम्यान एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलकांना आजपासून उपाययाेजना आणि कामाला सुरुवात केली जाईल असे आश्वासित केल्यानंतर आंदाेलकांनी रास्ता राेकाे मागे घेतला. तब्बल एक तासानंतर जुना मुंबई पुणे हायवेवरील वाहतुक सुरऴीत झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT