Horrific accident  Saam tv
मुंबई/पुणे

Accident : महिला मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Horrific accident in uttar pradesh : उत्तर प्रदेशमधील महिला मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Saam Tv

उत्तर प्रदेशच्या हापुडमध्ये भीषण अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मंत्री गुलाब देवी यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात गुलाब देवी जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर गुलाब देवी यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री गुलाब देवी यांच्या ताफ्यातील कार एकमेकांना धडकल्या. गुलाब देवी दिल्लीहून बिजनौर येथे निघाल्या होत्या. पिलखुवा कोतवाी क्षेत्रातील नॅशनल ९ मार्गावर हा अपघात झाला. या अपघाताच एक व्हिडिओ समोर आला आहे. मंत्री गुलाब देवी यांच्या ताफ्यातील एका कारने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाल्याचे दिसत आहे. याच ताफ्याच्या लेनमध्ये मंत्री गुलाब देवी यांचीही कार होती. या अपघातात गुलाब देवी देखील जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

शिक्षण मंत्री गुलाब देवी मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दिल्लीच्या बिजनौरला चालल्या होत्या. त्यांचा वाहनांचा ताफा दिल्ली-लखनौ हायवेवरून बिजनौरला निघाला होता. शिक्षण मंत्री गुलाब देवी यांच्यासहित दोन जण जखमी झाले आहेत.

मंत्री गुलाब देवी यांच्या कार अपघातानंतरही कारची एअरबॅग उघडली नाही. मंत्री गुलाब देवी यांच्या डोक्याला जखम झाली आहे. मंत्री गुलाब देवी यांना पिलखुवा येथील रामा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचा डोक्याचा सीटीस्कॅन देखील केला आहे. त्यानंतर पुढील उपचार सुरु केले आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हायवेवरून वाहने सुसाट जात आहेत. जड वाहने देखील सुसाट जात आहेत. या हायवेवरून मंत्री गुलाब देवी यांच्या वाहाचा ताफा जात होता. त्यांच्या ताफ्यातील एका कारने अचानक ब्रेक दाबला. त्यानंतर ताफ्यातील सर्व कार एकमेकांना धडकल्या. याच ताफ्यातील एका कारमध्ये मंत्री गुलाब देवी देखील होत्या. त्यांची कार देखील समोरील कारला धडकली. या अपघातानंतर एकच धावाधाव झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan Special : बहिण-भावाच्या नात्यात वाढेल गोडवा, रक्षाबंधनला घरीच झटपट बनवा 'ड्रायफ्रूट केक'

Date Night: पहिल्या डेटवर तुमच्या जोडीदाराला 'हे' प्रश्न नक्की विचारा

Astro Tips: संध्याकाळी दिवा लावण्याची वेळ कोणती?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी शिवसेना का फोडली? 3 वर्षानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली आतली बात

Ind vs Eng : कॅच सुटला की, मॅच? मोहम्मद सिराजची मोठी चूक अन् इंग्लंडला मिळालं जीवनदान, शुभमन गिल भडकला; Video

SCROLL FOR NEXT