
विनायक वंजारे, साम टीव्ही
मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन वातावरण ढवळून निघालं आहे. मीरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीने मंगळवारी मोर्चाची हाक दिली. मात्र, मराठी मोर्च्याच्या आदल्या दिवशी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. मीरा-भाईंदर पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता मनसे नेते अविनाश जाधव आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतलं. यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी महायुती सरकारवर टीका केली.
मीरा-भाईंदरमध्ये रेल्वे स्थानकाच्या बाहेर आंदोलकांनी चक्काजाम केला आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलक घटनास्थळी जमा झाले आहेत. जय भवानी जय शिवराय, अशा घोषणाबाजी आंदोलकांकडून दिल्या जात आहेत. मात्र, आजच्या मोर्चाच्या आधी पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्ते आणि नेत्यांना आदल्यादिवशी ताब्यात घेतलं. तसेच मनसेच्या काही नेत्यांनाही पोलिसांनी नोटीस बजावल्या. यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी महायुतीवर तोफ डागली.
अरविंद सावंत म्हणाले, 'मीरा भाईंदरमधील मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नसून मराठी अजेंडासाठीचा मोर्चा होता. मात्र सत्ताधारी पक्षाने मराठी माणसाच उच्चाटन करायचा डाव मांडला. तीन, साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना अटक करता ही तर आणीबाणी आहे'.
'भाजपने संविधान हत्या दिन साजरा केला. मात्र भाजप रोज संविधानाची हत्या करते. राज्यात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नाही हे संविधानाची हत्या की संविधानाचा सन्मान यांचं उत्तर द्यावं. लोकशाहीच्या मुळावर येणारी लोकं आहेत ही. पहलगाम विसरायचा हा त्यांचा मूळ अजेंडा आहे. माध्यमे रोज या बातम्या दाखवत राहिल्यामुळे एक नॅरेटीव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
'महाराष्ट्राने आधी हिंदीला विरोध केला नाही. हिंदी बोलतो म्हणून कधी मारलं नाही.सुशांत सिंह या कलावंताने आत्महत्या केली. बिहारच्या निवडणुकीत भाजपने त्याचा फोटो लावून प्रचार केला. आता देखील बिहार निवडणुकीसाठी हे सगळ सुरू आहे. खासदार निशिकांत दुबे महाराष्टात काय आहे विचारतो. आम्ही तेच म्हणतोय, महाराष्ट्रातून उद्योगधंदे गुजरातला गेले. झारखंडच्या खासदाराचे मराठी माणसाला तुमच्याकडे काय आहे हे विचारलं. आमच्या पैशावर जगता. हा माज भाजपच्या खासदाराला आला कुठून. मराठी माणसाला चिड येत नाही. भाजप ही लाचारांची फौज आहे, असे ते म्हणाले.
'मराठी भाषेसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला परवानगी कशाला हवी. मराठी भाषेला विरोध कारणासाठी सगळे एकवटतात. मात्र आम्ही जातीपातीत विखुरलेले आहोत. भाजपच्या खासदाराने मराठी माणसावर टीका केली हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारा, शिंदे गटाला विचारा, त्यांना हे लागलं की नाही लागलं, असंही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.