Navi Mumbai Murder Case: उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात (Yashashri Shinde Case) मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान नवनवीन ट्विस्ट येत आहेत. यशश्रीच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेला आरोपी दाऊद शेखची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. आरोपी त्याचा आणि यशश्रीचा मोबाइल कुठे टाकलाय हे पोलिसांना सांगत नाहीये. पोलिस या दोघांचा मोबाईल शोधत आहे. याप्रकरणामध्ये माबोईल हाच मोठा पुरावा आहे पण अद्याप पोलिसांना तो सापडला नाही. दाऊद शेखने यशश्रीच्या हत्येनंतर पूरावा नष्ट केल्याचे बोलले जात आहे.
यशश्री शिंदेची हत्या केल्यानंतर दाऊद शेख कर्नाटकला फरार झाला होता. पोलिसांनी त्याला गुलबर्ग्यातून अटक केली. पोलिसांनी चौकशी केली असता दाऊदने तिच्या हत्येची कबुली दिली. लग्नाला नकार दिला म्हणून हत्या केल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणात सगळ्यात मोठा पुराव म्हणजे दोघांचे मोबाईल आहेत. पण पोलिसांना अद्याप मोबाईल सापडले नाहीत. दाऊद शेखकडे यशश्रीचे काही आक्षेपार्ह फोटो होते. या फोटोवरूनच तो तिला सतत त्रास देत भेटायला येण्यास सांगत होता. आरोपीने तिचे फोटो फेसबुकला टाकल्यामुळे ती त्याला भेटायला गेली. त्यावेळी तिने तो फोटो डिलीट करण्यास सांगितला. त्यानंतर दाऊद तिला लग्न कर असंच बोलत राहिला. यावेळी त्यांच्यात वाद झाले आणि दाऊदने तिची हत्या केली.
यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊदने स्वत:चा मोबाईल फॉरमॅट केला. यशश्रीचा मोबाईल त्याने घटनास्थळावरून काही अंतरावर जाऊन फेकून दिला. पोलिस हा मोबाईल शोधत आहेत. दाऊदने या हत्या प्रकरणातला महत्वाचा पुरावाच नष्ट केला असल्याचे बोलले जात आहे. जर दोघांपैकी एकाचा जरी मोबाईल सापडला तरी या प्रकरणातील अनेक महत्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात. पोलिस आता सर्व बाजूने याप्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी गुरूवारी आरोपीला घटनास्थळावर नेले होते.
दरम्यान, यशश्री शिंदेचा शवविच्छेदन अहवाल बुधवारी समोर आला. या शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती उघड झाली होती. यशश्री शिंदेच्या शरीरावर दोन टॅटू आढळून आले होते. यामधील एक टॅटू आरोपी दाऊद शेखच्या नावाचा होता. यशश्रीने दाऊदचे नाव आपल्या शरीरावर कोरले होते. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पोलिस आता या बाजूने देखील तपास करत आहेत. यशश्री शिंदेचा मारेकरी दाऊद शेख सध्या तुरुंगात असून त्याला कोर्टाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.