Yashashri Shinde Case : ...तर यशश्री शिंदेचा जीव वाचला असता; उरण हत्याप्रकरणातील Exclusive माहिती साम टीव्हीच्या हाती

Yashashri Shinde And Dawood Shaikh: यशश्री शिंदे हत्या प्रकरणी एक मोठी update साम टीव्हीच्या हाती लागली आहे. आरोपी दाऊद शेखविरोधात २० जुलै रोजी अटक वॉरटं काढूनही त्याला अटक करण्यात दिरंगाई केल्यामुळे यशश्री शिंदेचा हाकनाक बळी गेला आहे.
Yashashri Shinde Case
Yashashri Shinde CaseSaam Digital
Published On

यशश्री शिंदे हत्या प्रकरणी एक मोठी update साम टीव्हीच्या हाती लागली आहे. 2019 साली यशश्री च्या कुटुंबियांनी पोस्को अंतर्गत दाऊद शेख वर गुन्हा दाखल केला होता. दाऊद शेख कोर्टात सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत असल्याने पनवेल न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट काढत अटक करण्याचे आदेश दिले होते. 20 जुलै रोजीच अजामीन पात्र वॉरंट काढून पोस्को गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश दिले होते, मात्र पोलिसांकडून त्याला अटक करण्यात करण्यात दिरंगाई करण्यात आली आणि यात यशश्रीचा हकनाक बळी गेला आहे.

जर पनवेल न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन नवी मुंबई पोलीसांनी तात्काळ केलं असतं तर 25 जुलैची घटना टळली असती. 22 तारखेपासून आरोपी दाऊद शेख नवी मुंबई क्षेत्रात दाखल होता. त्यानंतर 25 जुलैची रोजी यशश्रीची निर्घृण हत्या करण्यात आली.

संपूर्ण महराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला उरण पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कर्नाटकातल्या गुलबर्गा येथून दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी खाख्या दाखवल्यानंतर त्यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यशश्रीने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून तिची हत्या केल्याचं त्यांने सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार अशल्याची माहिती दिली. 

Yashashri Shinde Case
Pune Crime: बघून चालत जा असं म्हटल्याने तरुणाची सटकली, तिघांचे अपहरण करत जबर मारहाण; ऑनलाईन पैसे उकळले

दरम्यान दाऊद शेखच्या त्रासाला कंटाळून 2019 साल यशश्रीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोस्को अंतर्गत दाऊद शेख वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टाने त्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र दाऊद शेख कोर्टात सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत असल्याने पनवेल न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट काढत अटक करण्याचे आदेश दिले होते. 20 जुलै रोजीच अजामीन पात्र वॉरंट काढून पोस्को गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश दिले होते, मात्र पोलिसांकडून त्यांनतरही त्याला अटक करण्यात करण्यात दिरंगाई करण्यात आली. जर पोलिसांनी २० जुलैलाच अटक केली असती तर कदाचित हे हत्याकांड झालं नसतं. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Yashashri Shinde Case
Raigad Irshalwadi Landslide:... तर जीवितहानी टळली असती; शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी आधीच इर्शाळवाडीबद्दल केलं होतं 'सतर्क'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com