mumbai news  saam tv
मुंबई/पुणे

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकाला फटका, बदलापूरची प्रसिद्ध जांभळं महागली, आदिवासींच्या हक्काच्या रोजगारावर टांगती तलवार

Badlapur Famous Jamun: अवकाळी पावसाचा फटका हा जांभूळ पिकावर देखील बसला असून यामुळे जांभूळ खणाऱ्यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.

Omkar Sonawane

राज्यभरात सध्या अवकाळी पाऊस हा धुमाकूळ घालत आहे. या पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे पिकांचे आणि हंगामी फळांचे मोठे नुकसान होत आहे. यंदाचा पाऊस थांबायचे नाव घेत नसून यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. याच पावसामुळे महागाईने देखील उच्चांक गाठला आहे. आता याच पावसाचा परिणाम हा जांभूळ या फळावर देखील झाला आहे.

लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच हवाहवासा वाटणारा रानचा मेवा म्हणजेच जांभळं बाजारात दाखल झाली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळांना बसला आहे. या अवकाळी पावसामुळे जांभूळ पिकांचे मोठे नुकसान झाले असून पण किलो जांभळांसाठी 80 ते 100 रुपये मोजावे लागत आहेत.

एरंजाड, सोनिवली, जांभळा या गावांसोबत बदलापूरच्या आजूबाजूला असणाऱ्या खेड्यातील आदिवासी महिला जांभळाच्या पाट्या घेऊन विक्रीसाठी बदलापूरच्या बाजारात येत असतात. सध्या एका पाटीचा भाव हा अडीच हजार रुपयावर पोहचला आहे. बदलापूरची प्रसिद्ध जांभळं मुंबई आणि ठाणे परिसरात विक्रीसाठी जात असतात. हलवा, काला खट्टा, गिरवी अशा तीन प्रकारची जांभळ बाजारात उपलब्ध आहेत. मात्र आकाराने मोठी आणि चवीला अत्यंत गोड असल्याने बदलापूरच्या जांभळाला बाजारात प्रचंड मागणी आहे. बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकनही मिळाला आहे.

मात्र, यंदा अवकाळीमुळे जांभूळ पिकावर परिणाम झाला असून त्यामुळे आता दिवसाला फक्त 15 ते 20 पाट्या बाजारात येतात. आदिवासींना रानमेवा गोळा करण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते. तेव्हा संध्याकाळी आदिवासींच्या घरात चूल पेटते, मात्र सध्या सुरु असलेली वृक्षतोड अवकाळी यामुळे आदिवासींच्या हक्काचा रोजगार जाण्याच्या मार्गावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT