Sharad Pawar News Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar: शरद पवार मंचावर असतानाच गोंधळ, अज्ञात व्यक्ती व्यासपीठावर चढला; पोलिसांनी घेतलं ताब्यात; VIDEO

Mumbai News: मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमात एका अज्ञात व्यक्तीने गोंधळ घातल्याची बातमी समोर आली आहे.

Saam Tv

गणेश कवडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमात एका अज्ञात व्यक्तीने गोंधळ घातल्याची बातमी समोर आली आहे. येथे कार्यक्रमात सुरु असताना एक अज्ञात व्यक्ती व्यासपीठावर चढला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. हा व्यक्ती व्यासपीठावर चढला तेव्हा मंचावर शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उदय गुलाबराव शेळके फाऊंडेशनच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचा अनावरणा कार्यक्रमात होता. या कार्यक्रमात शरद पवार आणि बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. त्याच वेळी हा अज्ञात व्यक्ती मंचावर चढला आणि त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

ऐन कार्यक्रम सुरु असताना ही व्यक्ती मंचावर आली. हा व्यक्ती मंचावर आल्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं आणि मंचावरून त्याला खाली उतरवून ताब्यात घेतलं. मात्र हा व्यक्ती मंचावर का गेला होता, त्याने गोंधळ का घातला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस याप्रकरणी या अज्ञात व्यक्तीची चौकशी करत आहेत.

पुण्यात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राडा

दरम्यान, पुणे महापालिकेच्या स्वातंत्र्य दिन समारंभात एका दिव्यांग बांधवाने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्याची घटना ही आज घडली. या व्यक्तीने निषेध नोंदवल्यासाठी हा प्रकार केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

विनायक सोपान ओव्हाळ, असं या दिव्यांग बांधवाचं नाव आहे. ओव्हाळ यांच्या मागण्यांकडे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याचं, त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात महापालिक आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय वाहनाची काच पडून आपला निषेध नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

SCROLL FOR NEXT