Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत एक जण जागीच ठार झाला असून तिघे जखमी झाले आहेत.
Samruddhi Highway Accident
Samruddhi Highway AccidentSaam TV

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

Samruddhi Mahamarg Accident News

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा परिसरात गुरुवारी (ता. ११) सायंकाळच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत एक जण जागीच ठार झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

Samruddhi Highway Accident
Madha Lok Sabha: माढ्यात भाजपला मोठा धक्का, धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला राजीनामा

रंजित गौतम (वय ४० रा.सुलतानपूर उत्तरप्रदेश) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या अपघातात (Accident) संतोष छोटूलाल हरिजन (वय २५ उरण मुंबई) महिंद्र गौतम (वय ५० रा सुलतानपूर उत्तरप्रदेश) सोनू गौतम (वय ३० रा सुलतानपूर उत्तरप्रदेश) हे तीन जण किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर क्रमांक एमएच ०४ के एफ ८७४० मुंबईवरून कोलकाताकडे निघाला होता. सिंदखेडराजा (Buldhana) परिसरात आयशर आला असता, समृद्धी महामार्गावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की आशयर अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकला.

या घटनेत आयशर चालक रंजित गौतम याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर, शैलेश पवार, पोलीस हेड कॉस्टेबल काळुसे, पोलीस कॉस्टेबल सानप, एमएसएफ जवान गजानन जाधव, नागरे, राठोड, क्यू आर व्ही टीम उपस्थित होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेचा अधिकचा तपास बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Samruddhi Highway Accident
Beed Heavy Rain Video : बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट; भर उन्हाळ्यात नदी-नाल्यांना पूर, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com