Satara Bus Fire : पुणे बेंगलोर महामार्गावर बसने घेतला पेट; दुचाकीस्वार जळून खाक, पाहा थरारक VIDEO

Satara Bus Fire News : पुणे बेंगलोर हायवेवर सातारा जिल्ह्यातील पाचवडमध्ये एसटी बसने अचानक पेट घेतला. यात संपूर्ण बसला आग लागली होती. धक्कादायक म्हणजे दुचाकीवरील व्यक्तीही जळून खाक झाली आहे.
Satara Bus Fire
Satara Bus FireSaam Digital
Published On

पुणे बेंगलोर हायवेवर सातारा जिल्ह्यातील पाचवडमध्ये एसटी बसने अचानक पेट घेतला. यात संपूर्ण बसला आग लागली होती. धक्कादायक म्हणजे दुचाकीवरील व्यक्तीही जळून खाक झाली आहे. पलूस डेपोची ही बस पुण्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. बसमधील प्रवाशांबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. बसने पेट घेतल्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील भुईंज हद्दीत एसटीची दुचाकीला भीषण धडक बसली. त्र्यंबकेश्वरहून पलूसकडे जात असताना ही दर्घटना घडली. ही धडक इतकी भीषण होती की बस आणि दुचाकीनेही पेट घेतला. मात्र एसटीतील सर्व प्रवासी तात्काळ खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दुचाकी चालक बसखाली खाली अडकल्याने त्याचा होरपळून मृत्यू आहे. दरम्यान ग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. भुईंजचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

मोठा अनर्थ टळला...

त्र्यंबकेश्वरहून पलूसकडे जाणाऱ्या या बसमध्ये अनेक प्रवासी होती. बसची दुचाकीला धडक बसली आणि प्रवाशांची एकच ताराबळ उडाली. काही क्षणासाठी काय करायचं सूचत नव्हतं. त्यात बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र प्रवाशांनी आणि बसचालक आणि कन्डक्टरने प्रसंगवाधान राखत बसमधून वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Satara Bus Fire
Vidhan Sabha Election : मनोज जरांगें-संभाजी राजे एकत्र येणार?; विधानसभा निवडणुकांबाबत 'राजें'चं सूचक वक्तव्य

दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

बस आणि दुचाकीची जबर धडक बसली होती. मात्र यावेळी दुचाकीस्वार बसखाली अडकून पडला. कोणी मदतीला धावून येणार त्याआधीच बस आणि दुचाकीने पेट घेतला. दुचाकीस्वाराला बाहेरही पडता आलं नाही. क्षणार्धात दुचाकी आणि दुचाकीस्वार जळून खाक झाले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Satara Bus Fire
Maharashtra Politics : बारामतीनंतर कर्जत-जामखेडमध्येही रंगणार पवार विरुद्ध पवार सामना?; रोहित पवारांनीच केला गौप्यस्फोट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com