Farming Saam Tv
मुंबई/पुणे

Farming: IIT मुंबईच्या प्राध्यापकांचा अनोखा प्रयोग; शेतजमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूंचा शोध

Farming Experiment: भारतात सर्वाधिक लोकसंख्या शेती करते. शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतजमीन सुपीक नसणे ते पिकांना किड लागणे यामुळे शेतकरी चिंतेत असतो. परंतु यावर आता मार्ग निघाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मयुर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

भारतातील सर्वाधिक लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी शेतजमीन चांगली नसणे तर कधी पिकांना अळी लागणे, या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु आता शेतजमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूंचा शोध लावण्यात आला आहे.

पवईच्या आयआयटी मधील मुंबईचे संशोधक प्रा.प्रश्नात फळे यांनी लावला शेतजमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला आहे. या जिवाणूंच्या सहाय्याने होणार शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी मदत होणार असून शेतकऱ्यांना मात्र याचा फायदा होणार आहे. देशभरातील कृषी क्षेत्रासमोर कीटकनाशके आणि तणनाशके यांच्या रूपात असलेली ऑटोमॅटिक संयुगे ही मोठ्या समस्या आहे. ही संयुगे विषाक्त असून बियाणा अंकुर फुटू देत नाही आणि त्याच्यामुळे वनस्पतीची वाढ ही होत नाही.

यावर आयआयटी मधील संशोधकांनी प्रदूषित वातावरणातील जिवाणू शोधले. हे जिवाणू प्रजाती विशेषत सिडोमोनास आणि ऍसिनेटोबॅक्टर हे ऑरमॅटिक संयुगाचे वेगळे करतात आणि या प्रदेशाचे भक्षण करून त्यांचे साध्या आणि बिनविषारी संयुगांत विघटन करून प्रदूषित पर्यावरणाला नैसर्गिकरीत्या स्वच्छ करून या जिवाणूमार्फत इंडोर ऍसिटिक आम्ल तयार करत असल्याने वनस्पतींची देखील वाढ होते आणि हे जिवाणू माती स्वच्छ करणे बरोबरच माती सुपीक देखील बनवतात आणि वनस्पती निरोगी आणि सदृढ बनवतात असे आयडी मधील मुंबईच्या जैवविज्ञानिक आणि जैव अभियांत्रिक विभागाचे प्रा.प्रशांत फळे यांनी सांगितले.

याबाबत प्राध्यापक प्रा. प्रशांत फळे, (जैवविज्ञानिक आणि जैव अभियांत्रिकी विभाग) यांनी सांगितले की, हे जे जिवाणू आम्ही शेत जमीनितून आयसोलेट केले आहेत त्यांची महत्त्वाची भूमिका असते. पेस्टिसाइज किंवा केमिकल फर्टीलायझर जे जमिनी मध्ये वापरतो उत्पन्न चांगले येण्यासाठी ते टॉक्सिस पण असतात पणत्या टॉक्सि सिटीला हे बॅक्टेरिया किंवा हे जिवाणू रूपांतरीत करून त्याच्यापासून जे काही प्रॉडक्ट्स तयार होतात. ते तुमच्या शेतजमिनी मध्ये बायो फर्टीलायझर म्हणून काम करतात. तुमचं शेतीचं उत्पन्न वाढतं ते अन्नधान्य किंवा भाजीपाला स्वरूपात वाढत बायोमास फॉर्म मध्ये जवळजवळ वाढतं.

आमच्या एक्सपिरिमेंट मध्ये आम्हाला ते 40 ते 45 टक्के वाढलेलं उत्पन्न दिसून आलं. जेव्हा शेतीमध्ये पेस्टिसाइज वापरतो किंवा जास्त प्रमाणात फर्टीलायझर वापरतो तेव्हा त्याच्यामुळे बॅक्टेरिया जिवाणू तसेच शेत माला जे काही पीक आहेत त्याच्यावरती एका प्रकारचा स्ट्रेस जाणून येतो. या जिवाणू मध्ये बायो केमिकल रिएक्शन्स मेकॅनिझम आहे ती एक पर्टिक्युलर पातळी किंवा मेटापॉलीक पातळी एक्झेस्ट करतात त्याच्यामध्ये स्ट्रेस काढून घेतात आणि त्या कंडिशन मध्ये हे बॅक्टेरिया काय युनिक प्रोडक्स रिलीज करतात जेणेकरून बॅक्टेरिया वरचा किंवा जिवाणू वरचा स्ट्रेस शेत पिकांवरचा स्ट्रेस देखील कमी होतो त्यामुळे हे जिवाणू शेत जमिनीमध्ये जास्त उपयोगी आहेत

याबाबत संदेश पापडे (PHD स्कॉलर IIT) यांनी सांगितले की, हे जिवाणू आम्ही आयसोलेट केले किंवा शोधून काढले आहेत हे नैसर्गिक प्रक्रियेतून काढलेले आहेत. मातीतून बाकीचे जिवाणू किंवा जैविक विविधता असते जसं की बुरशी हा एक त्याचाच भाग आहे. बुरशीचा पिकांना त्रास होतो आणि शेत मालाला संसर्ग होतो. आमच्या संशोधनात आम्ही पाहिले हे जे बॅक्टेरिया किंवा जिवाणू आहेत यांच्याकडे अशी एक क्षमता आहे की ते फायटो पॅथोजेनिक म्हणजे प्लांट किंवा वनस्पती यांना त्रास देणाऱ्या बुरशी त्यांच्या विरोधात काही केमिकल्स सीक्रिएट करतात. त्याच्यामुळे त्या बुरशीची वाढ थांबवली जाते किंवा त्याला मारला जातो. अशा प्रकारचे जिवाणू आपण पिकांवर वापरले तर प्लांटला किंवा आपल्या पिकांना त्रास देणाऱ्या बुरशीची वाढ थांबवतात किंवा त्यांना मारतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT