Success Story: २५०० रूपयात व्यवसायाला सुरूवात, घरोघरी जाऊन लाडू विकले, आज ५० कोटींचा मालक, प्रमोद कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of Crorepati Ladduwala: बिहारच्या प्रमोद कुमार यांनी घरोघरी जाऊन लाडू विकले होते. त्यांनी आज स्वतः चा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांचा वर्षाचा टर्नओव्हर ५० कोटींचा आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न केल्यावर आयुष्यात आपल्याला यश हे मिळतेच. असंच काहीसं बिहारच्या प्रमोद कुमार यांच्यासोबत झालं. प्रमोद कुमार यांनी २५०० रुपयांची गुंतवणूक करुन ५० कोटींचा व्यवसाय उभारला आहे. प्रमोद कुमार यांचा लाडूचा व्यवसाय आहे. (Success Story)

प्रमोद कुमार हे आधी घरोघरी जाऊन ठेल्यावरुन लाडू विकायचे. त्यानंतर त्यांनी या व्यवसायाचे मोठ्या दुकानात रुपांतर केले. काही वर्षातच त्यांना हे यश मिळाले आहे. ते आज करोडपती लड्डूवाला म्हणून प्रसिद्ध आहे. (Success Story Of Pramod Kumar)

Success Story
Success Story: हलाखीच्या परिस्थितीतही जग जिंकलं; ठाण्याच्या मेकॅनिकची लेक २२ व्या वर्षी हवाई दलात ऑफिसर

प्रमोद कुमार यांचा हा ब्रँड हल्दीराम, बिकानेरसारख्या ब्रँडला टक्कर देत आहे. प्रमोद कुमार यांनी बिहार-झारखंडसोबत अनेक राज्यांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. प्रमोद यांचे बालपण खूप हलाखीच्या परिस्थिती गेले. त्यांचे वडील लहानपणी ठेल्यावरुन लाडू विकायचे. त्यांनी सरकारी शाळेत अॅडमिशन घेतले. परंतु त्यांचे शिक्षणात मन लागले नाही. त्यामुळे त्यांनी वडिलांसोबत व्यवसाय करायचे ठरवले.

प्रमोद कुमार यांना १४ व्या वर्षी वडिलांना कामात मदत करण्याचे ठरवले. त्यांच्या वडिलांना २५०० रुपयांची गुंतवणूक केले. त्यानंतर प्रमोद आणि त्यांचे भाऊदेखील लाडू विकायला लागले. त्यानंतर त्यांचे लाडू ग्राहकांना खूप आवडू लागले. त्यांचे लाडू खूप प्रसिद्ध झाले.

प्रमोद कुमार हे १९ ते २४ तास काम करायचे. ते लोक रात्री लाडू बनवायचे आणि दिवसा विकायचे. त्यानंतर त्यांनी खूप मेहनत केली. त्यांनी ठेल्याचा व्यवसाय मोठ्या शोरुममध्ये शिफ्ट केला. त्यांची आता लाडू बनवायची फॅक्टरी आहे.

Success Story
Success story: आर्मी ऑफिसरची लेक, परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडली, अन् तिसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; अंबिका रैना यांचा प्रेरणादायी प्रवास

प्रमोद शॉप यांच्या नावाने त्यांची ऑनलाइन वेबसाइटदेखील आहे. आज त्यांचा लाडूसोबत इतर मिठाई बनवण्याचा व्यवसाय आहे. आज त्यांचे ८ आउटलेट आहेत. त्यांचा टर्नओवर ५० कोटी रुपये आहे. प्रमोद लड्डू भांडार या नावाने त्यांची कंपनी आहे.

Success Story
Success Story: नोकरी सोडली अन् सुरु केला कॅब सर्व्हिसचा व्यवसाय; आज उभारली ६० कोटींची कंपनी; महाराष्ट्राच्या लेकाची यशोगाथा वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com