उल्हासनगरच्या गजानन मार्केट परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. उल्हासनगर आणि कल्याण अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. जवळच फटाका मार्केटही असल्यानं व्यापारी तसेच नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
उल्हासनगरमधील गजानन मार्केट फार मोठं आहे. येथे कल्याण, विठ्ठलवाडी, अंबरनाथ तसेच बदलापूर, वांगणी आणि कर्जतपर्यंतच्या व्यक्ती खरेदीसाठी येतात. या भव्य बाजारात विविध कपड्यांची दुकाने आहेत. संपूर्ण बाजारपेठेत कपड्यांचीच जास्त दुकाने आहेक. त्यासह रस्त्यावर विविध शोभेच्या वस्तू, दिवाळीचे कंदिल, महिलांसाठी सौंदर्यप्रसादने सर्व काही उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती मोठी खरेदी करायची असल्यास येथे येतात.
पुण्यात काल मध्यराञी दोन वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात असलेल्या मंतरवाडी येथे एका गोडाऊनमध्ये आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून फायरगाड्या आणि टँकर रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले सदर ठिकाणी पंधरा हजार सातशे स्क्वेअर फुट आणि अंदाजे दहा फुट भिंत असलेले पेंटचे गोडाऊनने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता.
जवानांनी तातडीने आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा सुरु करत आतमध्ये कोणी नसल्याची खाञी करत आगीवर सुमारे तासाभरात नियंञण मिळवत कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले. आगीमध्ये वाहने, औद्योगिक, घरगुती अशा अनेक प्रकारे वापरला जाणारा पेंटने भीषण स्वरुप धारण केले होते. आगीच्या तीव्रतेने पञ्याचे शेड मोठे लोखंडी गज वाकले गेले तसेच तेथील दोन टेम्पो आणि दोन दुचाकी वाहने ही जळाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.