Ulhasnagar Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Accident : भयंकर! भरधाव ट्रकने ५ रिक्षा, ३ दुचाकी उडवल्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा CCTV VIDEO

अजय दुधाणे

उल्हासनगरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथे १७ सेक्शन चौकात एका ट्रक चालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या तब्बल पाच रिक्षा आणि अनेक दुचाकी उडवल्याची घटना घडली आहे. ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडल्याचं बोललं जातंय. अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ सेक्शनकडून कल्याणच्या दिशेने एक मालवाहू ट्रक भरधाव वेगाने जात होता. हा ट्रक 17 सेक्शन चौकात येताच चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा आणि दुचाकींना फरफटत नेत डिव्हायडरला धडक दिली.

रिक्षात प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली, परंतु एक जण जखमी झाल्याचं बोललं जातंय. या अपघातात पाच रिक्षा आणि काही दुचाकी यांचं मोठं नुकसान झालंय. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

घटना सीसीटीव्हीत कैद

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, काही रिक्षा आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्क केल्या आहेत. येथेच जवळ एक व्यक्तीही उभा असल्याचं दिसत आहे. हा व्यक्ती येथून पुढे काहीच अंतरावर गेला असताना मागून अचानक एक भरधाव ट्रक येताना या व्हिडिओत दिसत आहे.

व्हिडिओत हा भरधाव ट्रक रस्त्यावर पार्क केलेल्या रिक्षा आणि दुचाकी चिरडत पुढे जाताना दिसत आहे. या अपघातात सीसीटीव्हीत दिसत असलेला व्यक्ती थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT