Shivaji Maharaj Statue : 'शिवरायांचा पुतळा हा आठ महिन्यात पडणं हा अपघात नाही, तर भ्रष्टाचार आहे'

Ambadas Danve on Deepak Kesarkar: नौदल दिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी कोसळला. यावरूनच आता विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत.
'शिवरायांचा पुतळा हा आठ महिन्यात पडणं हा अपघात नाही, तर भ्रष्टाचार आहे'
Ambadas Danve on Deepak KesarkarSaam Tv
Published On

''शिवरायांचा पुतळा हा आठ महिन्यात पडणं हा अपघात नाही, तर भ्रष्टाचार आहे', असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री दीपक केसरकर याना लक्ष्य केलं आहे. नौदल दिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी कोसळला. यावर दीपक केसकर म्हणाले होते की, हा अपघात आहे. यावरूनच आता विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत.

दीपक केसरकर यांच्यावर टीका करत अंबादास दानवे म्हणाले आहेत की, ''हे तुमच्या सरकारचं अपयश आहे. ही तुमच्या सरकारच्या गद्दारीची फळ आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण करून शिवरायांचा पुतळा पडणे याला अपघात समजता. अपघात हा मानवनिर्मित नसतो.'' ते पुढे म्हणाले, ''हा भ्रष्टाचारामुळे निर्माण झालेला मानवनिर्मित अपघात आहे.''

'शिवरायांचा पुतळा हा आठ महिन्यात पडणं हा अपघात नाही, तर भ्रष्टाचार आहे'
CM Eknath Shinde: लाडकी बहीण झाली, आता लाडका गोविंदा; टेंभी नाक्यावरून CM शिंदेंनी गोविंदांंसाठी कोणत्या घोषणा केल्या?

दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, मालवण मधल्या पुतळ्याकडे यंत्रणेस पूर्ण दुर्लक्ष झाल्याच्यामुळेच हा पुतळा कोसळला. तिथे पायगुण कोणाचे होते. तर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, असा टोला त्यांनी लगावला.

काय म्हणाले होते दीपक केसरकर?

दीपक केसरकर म्हणाले होते की, ''शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हा एक अपघात होता. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नेव्ही सोबत बैठक घेऊ आणि ठिकाणी किमान शंभर फूट उं,च असा भव्य पुतळा उभारून दाखवू.''

'शिवरायांचा पुतळा हा आठ महिन्यात पडणं हा अपघात नाही, तर भ्रष्टाचार आहे'
Shirdi Assembly Constituency: शिर्डीत यंदा कोण वाजवणार विजयाचा डंका? सध्या काय आहे राजकीय परिस्थिती, वाचा सविस्तर...

दरम्यान, दीपक केसरकर यांनी आज पुतळा दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी नेव्हीला कोणी दोष देत नसल्याचे सांगून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगीतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com