Jitendra Awhad News
Jitendra Awhad News Saamtv
मुंबई/पुणे

Jitendra Awhad News: ठाकरेंच्या एन्ट्रीआधीच ठाण्यातील वातावरण तापलं; स्वागताला विरोध, जितेंद्र आव्हाड संतापले

विकास काटे, ठाणे

Thane Breaking News:

मुंब्रामधील शिवसेनेच्या शाखेवरुन ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे या शाखेची पाहणी करण्यासाठी मुंब्रा येथे येणार आहेत.

मात्र उद्धव ठाकरेंच्या या भेटीला शिवसेना शिंदे गटाचा जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून ठाकरेंचे स्वागत करु नये, अशी विनंती केली आहे. ज्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (शनिवार, ११ नोव्हेंबर) मुंब्र्यात येणार आहेत. यावेळी त्यांचे जंगी स्वागत राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड करणार आहेत. मात्र या स्वागताला पोलिसांनी विरोध केला आहे.

कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी जेसीबी लावून उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्याकरिता परवानगी नाकारली आहे. "कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून जेसीबी लावून देणार नाही," असे पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सांगितले. मात्र यावर आव्हाडांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाड संतापले...

"महाराष्ट्रात प्रत्येक नेत्याच्या स्वागताला जेसीबी लावतात. अशा प्रकारे राजकीय नेत्यांचे जेसीबीने फुले उधळून स्वागत करता येणार नाही असा आदेश काढला आहे का? तसेच जेसीबीवरुन फुलांची उधळण करत एकनाथ शिंदेंचे स्वागत होऊ शकते, अजित पवार, शरद पवारांचे होऊ शकते. मग फक्त उद्धव ठाकरेंनाच विरोध का?" असा संतप्त सवालही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबईमध्ये राज ठाकरेंचा रोड शो होणार?

EPFO Auto Claim : EPFOचा नागरिकांना मोठा दिलासा; घर, लग्न, आजारपणासाठी करता येणार ऑटो क्लेम

Who Is Vaibhav Kale: इस्त्रायल-हमास युद्धात शहीद झालेले भारतीय लष्करी अधिकारी वैभव काळे कोण होते? देशाची २२ वर्ष केली होती सेवा

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाचं लोण महाराष्ट्रात पोहोचलं; 70 जणांसह बडा व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमतरता असल्यास 'ही' लक्षणे दिसून येतील

SCROLL FOR NEXT