BJP Vs Shiv Sena: कल्याणमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये अजूनही धुसफूस? BJP आमदाराने अप्रत्यक्ष केली मुख्यमंत्र्यांवर टीका

Kalyan News: कल्याणमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये अजूनही धुसफूस? BJP आमदाराने अप्रत्यक्ष केली मुख्यमंत्र्यांवर टीका
Kalyan BJP Vs Shiv Sena
Kalyan BJP Vs Shiv SenaSaam Tv
Published On

>> अभिजित देशमुख

Kalyan BJP Vs Shiv Sena:

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आज विकासकामावरून पुन्हा अप्रत्यक्ष रित्या शिवसेना शिंदे गटाला लक्ष केलं. भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले आहेत की, ''गाव आहे मामाचं कोणी नाही कामाचं. सत्तेत जे हिस्सेदारीत बसले आहे. त्यांना कल्याण पूर्वचा विकास करायचा नाही. माझा १२९ कोटीचा निधी कोणी थांबविला, हे तुम्हाला माहिती आहे. विविध खात्यातून येणारा प्रत्येक निधी आडविला जातो. कुणी कितीही अडविले तरी विकास होणारच.''

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता लक्ष्य केले आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेत भाजप शिवसेना शिंदे गटात धुसफूस कायम असल्याचे चित्र आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan BJP Vs Shiv Sena
Karnataka News: कर्नाटकमध्ये मंदिरात उसळली गर्दी, शॉक लागल्याने चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती; 19-20 भाविक जखमी; VIDEO

आज गणपत गायकवाड यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन विविध विकास कामे आणि समस्यांबाबत चर्चा केली. गायकवाड यांनी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट गेतली. भेटीनंतर आमदार गणपत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. (Latest Marathi News)

आमदार गायकवाड म्हणाले, पाणी समस्येबाबत केडीएमसीचे अधिकारी आम्हाला सांगतात ४९ एमएलडी पाणी मिळते. एमआयडीसीचे अधिकारी सांगतात ७० ते ७४ एमएलडी पाणी देतात. प्रत्यक्षात मंजूर कोटा १०४ एमएलडीचा आहे. पाणी कमी येते. त्याविषयी आम्ही आयुक्तांना सांगितले. त्याचबरोबर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मलंग गड रस्ता आणि अंतर्गत रस्ते स्वच्छ करणे. त्यावरील खड्डे भरणे , गार्डन, मैदान, हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेल्या जागा वर्षोनुवर्षे विकसीत केलेल्या नाहीत, अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.''

Kalyan BJP Vs Shiv Sena
Bihar Reservation Bill: बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 75 टक्क्यांवर जाणार? आरक्षण विधेयक विधानसभेनंतर विधानपरिषदेतही मंजूर

ते म्हणाले, काही लोक बोलतात की, आमदार गायकवाड यांनी काय विकास केला. त्यांच्या नेत्यांनी आमच्या समोर येऊन बोलले पाहिजे. त्यांच्या नेत्यांनी, महापौरांनी या जागा विकसीत केल्या असत्या तर, आज कल्याण पूर्वेतील विकासाचे वेगळे चित्र असते. या आरक्षित जागेवर बेकायदा बाधकामे झालेली आहे. त्या जागा ताब्यात घेतलेल्या नाहीत. या सर्व अडचणी आहे. दादासाहेब गायकवाड मैदानातील गॅलरी तयार करण्यात आली होती. त्याचे टेंडर ज्या कंपनीला दिले होते. त्याने अर्धवट काम केले आहे. त्याला कामाचे पैसे पूर्ण दिले आहेत. अशा अनेक गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com