Beed RTO ची धडक कारवाई; तिकिटाचे जादा पैसे घेणाऱ्या 40 ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई, 3 बस जप्त

ट्रॅव्हल्स चालकांनी जादा तिकीट दर घेतल्यास प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जादा तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
beed rto fines 43 travels bus operators for violating norms
beed rto fines 43 travels bus operators for violating normssaam tv

Beed News : बीड जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ऐन दिवाळीच्या हंगामात जास्तीचा तिकीट दर वसूल करणाऱ्या 3 खासगी बस जप्त करीत 40 बससेवर दंडात्मक कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान जास्तीचे तिकीट दर वसूल करणाऱ्या ट्रॅव्हल्सकडून भाड्याचे पैसे ग्राहकांना परत देण्यात आल्याने प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आभार मानले. (Maharashtra News)

beed rto fines 43 travels bus operators for violating norms
Yavatmal News : स्लॅब कोसळल्याने सात मजूर जखमी, दाेघांची प्रकृती चिंताजनक

दिवाळी निमित्त राज्य परिवहन महामंडळ तसेच खासगी बसला प्रवाशांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर घेवून काही खासगी बसचे व्यावसायिक प्रवाशांची लूट करतात. याबाबतची तक्रार बीड जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात देखील केली जात असे.

या तक्रारींच्या आधारे मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांनी त्यांच्या सहकार्यांसमवेत धडक तपासणी माेहिम राबवली. या माेहिमेत तीन ट्रॅव्हल्स बस जप्त करण्यात आल्या. तसेच या ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी बस मधून प्रवाशांना सोडण्यात आले. यावेळी प्रवाशांनी प्रशासनाचे आभार मानले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरटीओ कार्यालय, बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तिकीट दर निश्चित करण्यात आलेला असताना अधिकचे भाडे घेतल्याने 3 बस जप्त केल्या आहेत तर 40 वाहनांवर कारवाई केल्याची माहिती मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

beed rto fines 43 travels bus operators for violating norms
Mahabaleshwar News : जनरेटर स्फोटातील सात चिमुकल्यांपैकी महाबळेश्वरच्या लेकीची आज पुण्यात मावळली ज्याेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com