Uddhav Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : गृहखातं झोपा काढत होतं का? नागपूर हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंनी थेट CM फडणवीसांना सुनावलं

Uddhav Thackeray Latest news : नागपूर हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंनी थेट CM फडणवीसांना सुनावलं आहे. तसेच ठाकरेंनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे.

Vishal Gangurde

नागपूर : नागपूर पेटल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कारवाईचे आदेश दिले आहेत. नागपूरच्या हिंसाचारावरून उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली आहे. हिंसाचार पूर्वनियोजित होता, तर तुमचं गृहखातं झोपा काढत होतं का, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, ' बलाढ्य सत्तेला नमवून स्वराज्याची स्थापना केली होती. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता. पण महाराष्ट्राचा एक कणही जिंकू शकला नाही. महाराजांकडून प्रेरणा घेतलेले छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी आणि असंख्य मावळ्यांनी औरंगजेबाला मूठमाती दिली'.

'गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता. महाराष्ट्रातील माती जिंकू शकला नाही. महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. त्याच्यामुळे त्याचं थडगं उखाडण्याची भाषा करत असेल तर नुसतं भाषा आणि आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार फक्त वाफा सोडतंय का? मुख्यमंत्र्यांनी कबर उखाडण्यात असमर्थता दाखवली आहे. केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देत असेल तर, केंद्राला, भाजपला विचारावं लागेल की, औरंगजेब तुमचा कोण लागतो? असा सवाल ठाकरेंनी केला.

'दुसरी गोष्ट म्हणजे औरंजजेबाचं थडगं हे छत्रपती शिवाज महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. तुम्ही सरकारकडे जा. केंद्राकडे जा. औरंगजेबाची कबर उखडण्यास सांगा. या कार्यक्रमाला चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना बोलवा, अशा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा आरोपावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले,'गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे. आरएसएसचं मुख्यालय नागपुरात आहे. या नागपुरात हिंदू खतरे में, कसा काय? इतकं वर्ष काय केलं? हिंसाचार पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृहखातं झोपा काढत होतं का? पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला होता. तुम्हाला माहीत होतं तर, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं का? या एका प्रश्नात अनेक प्रश्न दडले आहेत. सरकार त्यांचं अपयश लपवण्यात आणखी अपयशी ठरत आहे'.

'भाजपचं हिंदूत्वचं ढोंग पाहिलं आहे. तुम्हाला हिरव्या रंगावर राग असेल. तर सर्वात आधी भाजपने झेंड्यातील हिरवा रंग काढून टाका. एका बाजूला हिंदूस्तान आणि पाकिस्तान करायचं,दुसऱ्या मॅच खेळायची. त्या मॅच यांची मुले जाऊन बघणार. अमित शहा यांचा मुलगा म्हणजे जय शहा मॅच आयोजित करणार. इकडे साध्या मुलांना हिंदूस्थान आणि पाकिस्तान करून लढवणार. हे हिंदूत्व कोणतं? असा सवाल ठाकरेंनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT