Maharashtra Politics : भाजपची ताकद वाढणार; सहकार क्षेत्रातील बडा मोहरा गळाला लागला

Maharashtra Political News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद वाढणार आहे. सहकार क्षेत्रातील बडा मोहरा गळाला लागला आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Politics Saam tv
Published On

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाली आहे. परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सीताराम घनदाट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वागत केलं.

Maharashtra Political News
Shirdi Airport : थरारक! विमानतळावर बिबट्यांचा वावर; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धडकी भरवणारा VIDEO समोर

गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी मंगळवारी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आमदार बबनराव लोणीकर, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, रामप्रसाद बोर्डीकर, राहुल लोणीकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. चव्हाण यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत केले.

घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, बाजार समिती सदस्य, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आ. बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश झाले.

यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडणार याचा विश्वास वाटल्याने घनदाट यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अभ्यूदय बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठं काम करणारे घनदाट यांच्या भाजप प्रवेशामुळे परभणीमध्ये पक्ष संघटनेला बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

घनदाट यांच्यासोबत शरद पवार गटाचे परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद बुधवंत, 'वंचित' आघाडीचे नेते सुरेश फड, अनंत देशमुख, सरपंच गजानन कांगणे, रमेश गिते यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. परतूर (मंठा) नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, मंठा माजी नगराध्यक्ष नितीन राठोड, मंठा नगरसेवक विकास सूर्यवंशी यांच्यासह अन्य 10 नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला आहे.

Maharashtra Political News
Shirdi Airport : थरारक! विमानतळावर बिबट्यांचा वावर; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धडकी भरवणारा VIDEO समोर

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पालम तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये परभणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिवअप्पा ढेले, जयसिंगराव शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गोपीनाथराव तुडमे, नगरसेवक कैलास रुद्रवार, गौतम हत्तीआंबीरे, पंचायत समिती माजी सभापती आत्माराम सोडनर, सुभाषराव धुळगुंडे पेंडु, पेंडु खुर्दे सरपंच देवबा धुळगुंडे, पेंडु बु. सरपंच दत्तराव धुळगुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Maharashtra Political News
Supriya Sule : '6 महिन्यात आणखी एक विकेट'; सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर महायुतीचा कोणता मंत्री? VIDEO

रत्नागिरीत ठाकरेंना पुन्हा धक्का

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रत्नागिरी तालुक्यातील ठाकरे गटाचे उप तालुका प्रमुख राकेश साळवी, कार्यालय प्रमुख संदीप सुर्वे, शाखाप्रमुख दीपक गावडे आणि दत्ता घडशी, उपविभाग प्रमुख (नाचणे) दिनेश रेमुलकर, सचिव दीपक सुकल यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

शरद पवार गटालाही धक्का

छत्रपती संभाजीनगर येथील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही याच कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश केलाय. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश झाले. यावेळी आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, विजय निकाळजे, शहर सचिव अंकुश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, मध्य विधानसभा अध्यक्ष फिरोज कुरेशी, अल्पसंख्याक विभाग शहर अध्यक्ष अस्लम शरीफ आदींचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com