'होम मिनिस्टर' (Home Minister) हा प्रेक्षकांच्या आवडीचा आणि महिलांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम जगभरात घराघरात पोहचला. या कार्यक्रमाला २० वर्ष पूर्ण झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आदेश बांदेकर ( Adesh Bandekar) घराघरात पोहचले. या प्रवासात त्यांनी अनेक जोडप्यांच्या प्रेमकथा उलघडल्या आहेत. हा प्रवास भावनांनी भरलेला होता. आदेश भाऊजींनी अनेक वहिनींच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. नात्यातील दुरावे दूर केले.
'होम मिनिस्टर' या शो मुळे अनेक नातेसंबंध देखील चांगले झाले. भाऊजींनी प्रत्येकाला आपल्या घरातले मानले. अनेक वहिनींना पैठणी देऊन त्यांचा मान वाढवला. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून महिलांना थोडा निवांत मिळावा म्हणून त्यांनी विविध खेळ वहिनींना खेळायला सांगितले. तसेच या कार्यक्रमाने प्रत्येक टप्प्यावर प्रगती केली आहे. अनेक महाराष्ट्रात अनेक वाऱ्या देखील केल्या आहेत. आदेश बांदेकर खूप कमी वेळात प्रत्येकाच्या घरातील सदस्य झाले. वहिनीने लाडाने भाऊजींना खाऊ घातले.
१३ सप्टेंबर २००४ रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आजवर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता १३ सप्टेंबर २०२४ रोजी वहिनींचा लाडका 'होम मिनिस्टर' शो निरोप घेत आहे. या कार्यक्रमाला १३ सप्टेंबर रोजी २० वर्ष पूर्ण होणार आहेत. या कार्यक्रमाचा अल्पविराम खास करून वहिनींनसाठी खूप धक्कादायक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर अनेक माऊलींना भेटले. लाखो वहिनींनाच्या चेहऱ्यावर भाऊजींनी आनंद आणला आहे. स्वतः आदेश बांदेकर यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून ही बातमी प्रेक्षकांना दिली आहे. '२० वर्षांचा प्रवास...चला घेऊया विश्रांती' असे कॅप्शन त्यांनी पोस्टला दिले आहे. गणेशोत्सव स्पेशल शेवटचा भाग होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.