Uddhav Thackeray x
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदार शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Shivsena UBT : पुण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी ठाकरेंना रामराम म्हणत अजित पवारांची साथ धरली आहे. यामुळे पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

Yash Shirke

Pune : पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. महादेव बाबर यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडुणकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केल्याचे म्हटले जात आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीसाठी सज्ज होत असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षाला गळती सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महादेव बाबर यांच्यासोबत निलेश मगर, योगेश सासणे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक ठाकरे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने महादेव बाबर नाराज होते असे म्हटले जात आहे. शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांना त्यांची अनुपस्थिती होती. बाबर यांच्या प्रवेशामुळे पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाचे राज्य सचिव संजय लाखे यांनी काल राजीनामा दिला. त्यानंतर पुणे, नाशिक या महानगरांमधील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला सलग धक्के बसले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh : "लवकरच येत आहोत..." रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, रिलीज डेट काय?

Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

Matar 5 Dishes : हिवाळ्यात आवर्जून बनवा मटारच्या या ५ डिशेस

SCROLL FOR NEXT