मुंबई/पुणे

Maharashtra Politics : नव्या वर्षातच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पुणे पालिका निवडणुकीआधीच ६ नेते भाजपमध्ये जाणार

Uddhav thackeray Latest News : नव्या वर्षातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. पुणे पालिका निवडणुकीआधीच ६ माजी नगरसेवक साथ सोडून भाजपमध्ये जाणार आहेत.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : नव्या वर्षातच उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसणार आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार आहे. ठाकरेंचे ६ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मागील आठवड्याभरात उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा धक्का बसणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक साथ सोडणार असल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. भाजप उद्धव ठाकरे मोठा धक्का देणार आहे. आगामी पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे पुण्यात लक्ष देत नसल्याने अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे ५ माजी नगरसेवक मुंबईत ५ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. बाळा ओसवाल, विशान धनवडे यांच्यासह आणखी ४ नगरसेवक प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे.

नाशिकमध्येही ठाकरे गटाला मोठा धक्का

काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. नाशिकमधील ठाकरे गटाच्या एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामांवर प्रभावित होऊन पक्षप्रवेश केल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पालिका निवडणुकीआधी पदाधिकाऱ्यांना सांभाळणे, हे ठाकरे गटापुढे आव्हान असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. एकीकडे या निवडणुका येत्या तीन ते चार महिन्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याच निवडणुकीदरम्यान, ओबीसीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कोर्टात सुरु आहे. या प्रकरणाचा निकाल जानेवारी महिन्यात लागला तर या निवडणुका एप्रिलमध्ये होऊ शकतात. हा निकाल लांबला तर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होऊ शकतात, असेही बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संभाजीनगर हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली १७ वर्षीय तरुणी; नेमकं काय घडलं?

Breakfast Recipe: पौष्टिक आणि चवदार, ऑफिसला जाण्यापूर्वी नवऱ्यासाठी बनवा हे 4 नाश्ता प्रकार

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Whatsapp: व्हॉट्सॲपच्या ३ अब्ज युजर्सवर मोठं संकट, नव्या टूलने वाढवलं टेन्शन; तुमच्या मोबाइलवर ठेवतंय लक्ष

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

SCROLL FOR NEXT