Railway Reservation : रेल्वे आरक्षणाची वेबसाईट बंद; रिझर्वेशन होत नसल्याने नागरिकांना त्रास

Wardha News : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या अनुषंगाने बहुतेकजण बाहेर जाणे पसंत करतात. काही जण बाहेर गेले आहे याकरिता रेल्वे आरक्षण करत असून ऑनलाईन आयआरसीटीच्या वेबसाईट पर्याय
IRCTC Website
Railway ReservationSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: नववर्षाच्या सेलिब्रेशन करण्याच्या निमित्ताने बाहेर जाण्याचा अनेकांनी बेत आखला आहे. त्यानुसार काहीजण बाहेर देखील पडले आहेत. मात्र ऐनवेळी बाहेर जाणाऱ्यांसाठी रेल्वे आरक्षण करणे आता शक्य नाही. कारण आज पुन्हा आयआरसीटी रेल्वेच्या आरक्षणाची वेबसाईट पुन्हा बंद पडली आहे. यामुळे रेल्वेचे आगाऊ आरक्षण तसेच तात्काळ आरक्षण करणाऱ्यांसाठी अडचणीचे होत आहे. 

रेल्वेने बाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासाठी आगाऊ आरक्षण केले जात असते. तर अचानक बाहेर जाण्याचे ठरल्यास तात्काळ आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध आहे. यातच सध्या सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या अनुषंगाने बहुतेकजण बाहेर जाणे पसंत करतात. त्यानुसार काही जण बाहेर गेले आहेत. तर काहींचे ठरत आहे. याकरिता रेल्वे आरक्षण करत असून ऑनलाईन आयआरसीटीच्या वेबसाईट हा पर्याय आहे. मात्र हीच वेबसाईट बंद पडली आहे.

IRCTC Website
Tiger Death : पट्टेरी वाघ आढळला मृतावस्थेत; भंडाऱ्याच्या लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील घटना, नेमकं कारण काय?

वेबसाईट बंद झाल्याने नागरिकांना त्रास
रेल्वेच्या आरक्षणासाठीची आयआरसीटीची वेबसाईट तांत्रिक कारणामुळे बंद पडली आहे. यामुळे आरक्षण करणे आता थांबले आहे. दरम्यान नववर्षकरिता बाहेर गेलेल्या अनेक नागरिकांना याचा फटका बसणार आहे. तसेच सकाळी दहा वाजता एसी क्लास व अकरा वाजता स्लीपर क्लासचे तात्काळ आरक्षण सुरू होत असते. मात्र  तात्काळ रिजर्वेशन काढणाऱ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. 

IRCTC Website
Jalgaon Crime : जळगावातील २४ लाखांच्या चोरीचा उलगडा; मोलकरणीनेच केला हात साफ

पंधरा दिवसात चौथ्यांदा वेबसाईड बंद 

दरम्यान आयआरसीटीची वेबसाईट तात्काळ आरक्षणवेळी वारंवार बंद होत आहे. यापूर्वी २६ डिसेंबरला देखील वेबसाईट बंद झाली होती. मागील पंधरा दिवसात चौथ्यांदा वेबसाईट बंद पडली आहे. यामुळे नववर्षकरिता बाहेर गेलेल्या नागरिकांना अडचण होत आहे. फिरायला गेलेल्या अनेक नागरिकांच्या तिकीट अडकले असून अचानक वेबसाईट बंद झाल्याने तारांबळ उडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com