Tiger Death : पट्टेरी वाघ आढळला मृतावस्थेत; भंडाऱ्याच्या लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील घटना, नेमकं कारण काय?

Bhandara News : भंडाऱ्याच्या लेंडेझरी वनपरिक्षेत्र परिसरातील देवनारा ते चिखली मार्गावरील राखीव वनातील देवनारा तलावाजवळ वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेने वन विभागात मोठी खळबळ उडाली
Tiger
Tiger Saam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: पट्टेदार वाघांची संख्या कमी आहे. यात भंडाऱ्याच्या लेंडेझरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या राखीव वनात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या पट्टेदार वाघाचा मृत्यू कशामुळे झाला आहे. याचे कारण समोर आले नसून शवविच्छेदनानंतर नेमके कारण समजू शकणार आहे. 

भंडाऱ्याच्या लेंडेझरी वनपरिक्षेत्र असलेल्या परिसरातील देवनारा ते चिखली मार्गावरील राखीव वनातील देवनारा तलावाजवळ कक्ष क्रमांक ६२ मध्ये वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेने वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मृत वाघ हा नर प्रजातीचा असून तो दीड वर्षाचा आहे. वाघाच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवाल नंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. 

Tiger
Dhule Crime News : लग्न समारंभातून चोरलेले २६ तोळे सोने हस्तगत; चोरटे मात्र फरार

नागरिकांना दिसला वाघ 

दरम्यान देवनारा येथील तलावाजवळ शंकरपट बघायला गेलेल्या नागरिकांना हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. नागरिकांना वाघ जमिनीवर पडलेला दिसून आल्याने नागरिक भयभीत झाले होते. मात्र त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता वाघ मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली.  

Tiger
Nagar- Beed Railway Line : बीड स्टेशनवर २६ जानेवारीपर्यंत येणार रेल्वे; विघनवाडी ते राजूर रेल्वे चाचणी पूर्ण

रामकुंड परिसरात बिबट्याचा गाईवर हल्ला
धाराशिव
: धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासुन बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. सातत्याने बिबट्या पाळीव जनावरांवर हल्ला करत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यातच भुम तालुक्यातील रामकुंड गावठाण तळ्याच्या परिसरात असलेल्या शेतामध्ये बिबट्याने शेतकरी सुदाम हाके यांच्या गाईवर हल्ला केल्याची घटना रात्री घडली. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. दरम्यान बिबट्याच्या सुरू असलेल्या मुक्त वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com