Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : हिंदी सक्तीचे जीआर रद्द, आता ५ जुलैला मोर्चा होणार का? उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Uddhav Thackeray on language row : हिंदी सक्तीचा शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला आहे. फडणवीस सरकारच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Vishal Gangurde

हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी भाषा सक्तीचे दोन शासन रद्द केले आहेत. फडणवीस सरकारच्या निर्णयानंतर मनसेच्या कार्यकत्यांनी जल्लोष केला. तर संजय राऊत यांनी ५ जुलै रोजीचा मोर्चा निघणार नसल्याचे सांगितलं. फडणवीस सरकारच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'आता 5 जुलैला मोर्चा नसेल. पण जल्लोष किंवा विजयी सभा होणार असल्याचे उद्ध ठाकरे यांनी सांगितले.

फडणवीस सरकारच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'हिंदी सक्ती विरोधात आज राज्यभर आंदोलन केले. जीआरची होळी केली. मराठी भाषा कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालो. सक्तीपेक्षा शक्ती भारी पडली. सगळेजण पक्ष भेद विसरून एकत्र झाले. सरकारचा डाव उधळून लावला. राज्यातील सरकारने मराठी माणसाची एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला. मराठी अमराठी वाद करून अमराठी मते घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मराठी माणसांमध्ये फूट फाडण्याचा प्रयत्न केला'.

'5 तारखेचा मोर्चा होऊ नये म्हणून जीआर रद्द केला. मराठी माणूस एक होऊ द्यायचच्या नाही. समितीला आता अर्थ नाही. सक्ती होऊ देणार नाही. समिती कुणाची नाही. भाजप खोट्याची फॅक्टरी आहे. अफवाची फॅक्टरी एक चित्रपट काढावा. मुख्यमंत्र्यांना मराठी कळत नसल्याने मी मराठी सक्तीची केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले त्यावर मी रघुनाथ माशेलकर समिती नेमली. अहवाल सादर झाल्यावर एक अभ्यास गट नेमला गेला. त्यानंतर सरकार पाडलं, असे ठाकरे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT