Amravati News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील अमरावतीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यांसहित सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. ठाकरेंची सभा संपताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशीही झटापट केली. (Latest Marathi News)
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे अमरावतीत राजकीय वातावरण तापलं आहे. अमरावतीत ठाकरे गटाने राणा दाम्पत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांची सभा संपल्यानंतर ठाकरे गटाने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं.
उद्धव ठाकरे यांची सभा संपताच ठाकरे गटाकडून रवी राणा व नवनीत राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. त्यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलीस व ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. आज राणा दाम्पत्यांच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंचे विदर्भ दौऱ्याचे बॅनर फाडण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राणांचेही बॅनर फाडण्यात आले होते. या घटनेवरून संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली.
'या प्रकरणाची किंमत त्यांना चुकवावी लागेल. आज बॅनर फाडत आहे, कारण त्यांच्यामागे सत्ता आणि पोलीस आहे. राणा दाम्पत्यांनी गुंडगिरी झुंडगिरी आम्हाला शिकवू नये, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही आज भरसभेत राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली. 'हनुमान चालीसा पठण करा. पण तो द्रोणागिरी हनुमानाच्या हातातला वेगळा होता आणि यांच्या हातातील उपऱ्यांच्या द्रोणागिरीखाली तुम्ही दबून जाताय हे तुमच्या लक्षात येतंय का? असा सवाल करत ठाकरेंनी राणा दाम्पत्यांना फटकारलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.