

Eknath Shinde News: अजित पवार यांच्यासह ९ जणांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणते खाते येणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याचीही जोरदार चर्चा रंगली आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)
शिंदे गटातील अनेक नेते मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे अनेकांचे लक्ष मंत्रिपदाच्या विस्ताराकडे लागले आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आठवड्याभराचा कालावधी लोटला आहे.
त्यात अजित पवार गटाच्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपचा प्रश्नावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, पोलिसांच्या घराविषयीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं भाष्य केलं. 'महाराष्ट्र पोलीस यांना १५ लाख रुपयांमध्ये घरे मिळावे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,'महाराष्ट्र महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत'.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दोघेही जळगाव विमानतळावर पोहोचल्यानंतर धुळ्याला रवाना झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.