Meeting Inside Story  Saam tv
मुंबई/पुणे

Meeting Inside Story : उद्धव ठाकरे अनुपस्थित, आदेश निघाला; मातोश्रीवरच्या आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय, नक्की काय घडलं?

uddhav thackeray Meeting Inside Story : मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Saam Tv

रुपाली बडवे, गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने बैठकांचा सपाटा लावला आहे. शिवसेनेच्या काही विद्यमान आमदारांची मातोश्रीवर बैठक सुरु आहे. या विद्यमान आमदारांना उमेदवारीची खात्री देण्यात आली आहे. विद्यमान आमदारांना उमेदवारीचाही शब्द दिला आहे. उद्धव ठाकरे अनुपस्थितीत ही बैठक सुरु आहे. ठाकरेंच्या अनुपस्थितीतच ठाकरे गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे अनुपस्थितीत असल्याने ठाकरे गटाच्या आमदारांना आज एबी फॉर्म देण्यात आले नाहीत. मात्र लवकरच त्यांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. तसेच उमेदवारीची यादी जाहीर होण्याची वाट बघू नका, तुमच्याबाबतीत ती सर्व औपचारिकता असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.

आज मातोश्रीवर विद्यमान आमदारांना विधानसभा निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विद्यमान आमदारांना उमेदवारीची खात्री देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत प्रत्येक आमदारांसोबत वैयक्तिकरित्या भेट घेतली जात आहे.

आदित्य ठाकरे वैयक्तिकरित्या आमदारांसोबत चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक सुरु आहे. उद्धव ठाकरे बैठकीत नाहीत. तब्येतीच्या कारणास्तव ते बैठकीत नाहीत. तर आज मातोश्रीवर उपस्थिती न राहणाऱ्या आमदारांची कारण अस्पष्ट आहेत. यामध्ये अजय चौधरी, उदयसिंग राजपूत, प्रकाश फातर्पेकर यांचा समावेश आहे.

मातोश्रीवर कोणते आमदार उपस्थित आहेत?

आदित्य ठाकरे

सुनील प्रभू

सुनील राऊत

राजन साळवी

ऋतुजा लटके

संजय पोतनीस

कैलास पाटील

रमेश कोरगांवकर

भास्कर जाधव

शंकरराव गडाख

वैभव नाईक

नितीन देशमुख

राहुल पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT