Maharashtra Politics : वरळीत रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना? आदित्य यांच्या विरोधात काका राज ठाकरे कोणती खेळी खेळणार? पाहा व्हिडिओ

Maharashtra Political News : वरळीत ठाकरे विरुद्ध विरुद्ध सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरे कोणता डाव खेळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.

मुंबई : आगामी वरळी विधानसभा हायव्होस्टेज ठरणार आहे. वरळी विधानसभेत ठाकरे विरुद्ध ठाकरे आमने-सामने लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना मनसे नेते अमित ठाकरे देणार टक्कर देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी A+ संकल्पनेला मनसे वरळी व्हिजनने उत्तर देणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित होणाऱ्या वरळी व्हिजन कार्यक्रमाला शिवसेना आणि भाजपचा पाठिंबा असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघाची ब्लू प्रिंट म्हणजेच वरळी व्हिजन आहे. आज हे व्हिजन वरळी जांबोरी मैदानात मांडण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com