uddhav thackeray saam tv
मुंबई/पुणे

चाळीस डोक्यांच्या रावणाने धनुष्यबाण गोठवलं; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधला

Vishal Gangurde

Uddhav Thackeray News : निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं. चाळीस डोक्याच्या रावणाने धनुष्यबाण गोठवलं. उलट्या काळजाची माणसे आणि कंपू फिरतोय. त्यांनी कट्यार आईच्या काळजात घुसवली. याचा आनंद त्यांच्या महाशक्तीला झाला असेल, अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेनेचं चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'मुळात न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप आलेला नसताना निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच आश्चर्य वाटतं. जर ते अपात्र ठरले तर आज हे चिन्ह काही काळापुरत गोठवलं त्याची जबाबदारी कोण घेणार?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

'सध्या शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात आहेत. आणीबाणीच्या काळातही हे झालं नव्हतं. इंदिरा गांधींकडे तेव्हा प्रस्ताव गेला होता, शिवसेनेवर बंदी घाला. परंतु त्यांनी शिवसेनेवर बंदी घातली नाही. मात्र तुमच्या कृतीतून तुमचा हेतू आता स्पष्ट झाला आहे, तुम्हाला शिवसेना संपवायची आहे. कॉंग्रेसने जे केलं नाही ते तुम्ही करु दाखवलं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरही जोरदार टीका केली. 'त्यांना मुख्यमंत्रिपदी शिवसेना प्रमुखांचा मुलगा नको हे आम्ही मान्य केलं. सर्व देऊनही नाराज असल्याचं सांगून काही जण निघून गेले. पण आता जरा अती होत आहे. कारण काही जण शिवसेनाप्रमुख व्हायला निघाले आहेत. आपला पारंपारिक दसरा मेळावा होऊ नये यासाठी देखील खोकासुराने प्रयत्न केले. परंतु न्यायदेवता देवता शब्दाला जागली. अभूतपूर्व मेळावा झाला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT