निवृत्ती बाबर
Kishori Pednekar News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठावल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्योरापाची मालिका सुरू झाली आहे. शिवसेनेचं (Shivsena) चिन्ह गोठावल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. किशोरी पेडणेकर म्हणाल्या,' काल जो निर्णय आला. त्यातले काही अपेक्षिथ होते. आमचा पक्ष हा स्त्रीलिंगी आहे. आम्ही शिवसेनेला आमची आई म्हणतो. त्या आईला या गद्दारांनी या उंबरठ्यावर आणून ठेवले'.
'उद्धव ठाकरे निवांत आहे. जेव्हा संकट आलं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं आहे. फक्त नाव घेतले म्हणून बाळासाहेब ठाकरेंचे रक्त होत नाही. ते धमण्यांमधून वाहावे लागते. उद्धव ठाकरे सर्व संकटाला सामारे गेले. पण हे संकट नाही तर फक्त वावटळ आहे', असेही त्या म्हणाल्या.
'निवडणूक आयोगावर दबाव आला असेल. पण आम्ही दबावाला बळी पडत नाही. उधारीचा बाप आणि उधारीचे समर्थन मिळवून काही होत नाही. हे दसरा मेळाव्याला दिसून आले, अशा शब्दात पेडणेकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. किशोरी पेडणेकरांच्या टीकेनंतर शिंदे गटातील नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाईल, हे पाहावे लागणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.