Uddhav Thackeray: आता जरा अती होतंय, काहींना शिवसेनाप्रमुख व्हायचंय; उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

आपला पारंपारिक दसरा मेळावा होऊ नये यासाठी देखील खोकासुराने प्रयत्न केले.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySaam Tv
Published On

मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदी शिवसेना प्रमुखांचा मुलगा नको हे आम्ही मान्य केलं. सर्व देऊनही नाराज असल्याचं सांगून काही जण निघून गेले. पण आता जरा अती होत आहे. कारण काही जण शिवसेनाप्रमुख व्हायला निघाले आहेत. आपला पारंपारिक दसरा मेळावा होऊ नये यासाठी देखील खोकेसुराने प्रयत्न केले. परंतु न्यायदेवता देवता शब्दाला जागली. अभूतपूर्व मेळावा झाला., अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

CM Uddhav Thackeray
आम्ही शिवसेनेला आई म्हणतो, त्या आईला गद्दारांनी...'; किशोरी पेडणेकारांची शिंदे गटावर सडकून टीका

शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले. शिवसेना वाढवण्यासाठी अनेकांची हात पुढे आले. अनेकजण आले, मेहनत घेतली. मग मुंबई पालिका आली. काहीना वाटत मीच केलं, अस नाहीये, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. (Latest Marathi News)

ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला. ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला. हिंदू अस्मिता जपली त्या शिवसेनेचा तुम्ही घात करायला निघालात? काय मिळालं तुम्हाला? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.

CM Uddhav Thackeray
शरद पवारांवर आरोप करणं हा एक मूर्खपणा; एकनाथ खडसेंचे विजय शिवतारेंना जोरदार प्रत्युत्तर

सध्या शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात आहेत. आणीबाणीच्या काळातही हे झालं नव्हतं. इंदिरा गांधींकडे तेव्हा प्रस्ताव गेला होता, शिवसेनेवर बंदी घाला. परंतु त्यांनी शिवसेनेवर बंदी घातली नाही. मात्र तुमच्या कृतीतून तुमचा हेतू आता स्पष्ट झाला आहे, तुम्हाला शिवसेना संपवायची आहे. कॉंग्रेसने जे केलं नाही ते तुम्ही करु दाखवलं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

मुळात न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप आलेला नसताना निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच आश्चर्य वाटतं. जर ते अपात्र ठरले तर आज हे चिन्ह काही काळापुरत गोठवलं त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com